सरस्वती वाचनालयातर्फे पुरस्कार प्रदान : सर्व समाजासाठी आदराचे स्थान असल्याचे गौरवोद्गार
बेळगाव : धर्मशास्त्र, अध्यात्म, शिक्षण, साहित्य, कृषी अशा सर्व क्षेत्रात अनमोल कामगिरी केलेले डॉ. सिद्धराम महास्वामी हे सर्व समाजासाठी आदराचे स्थान आहे. सरस्वती वाचनालयातर्फे त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन त्यांना बेळगाव भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. रविवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्राचार्य डॉ. बसवराज जगजंपी उपस्थित होते. व्यासपीठावर वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, अध्यक्ष स्वरूपा इनामदार, कार्यवाह आर. एम. करडीगुद्दी, विश्वस्त अॅङ अजय सुनाळकर उपस्थित होते.
प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वरूपा इनामदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्वामींचा परिचय करून देऊन वृंदा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जगजंपी यांचा परिचय डॉ. दत्तप्रसाद गिझरे यांनी करून दिला. स्वामींना दिलेल्या मानपत्राचे वाचन खजिनदार विजय देशपांडे यांनी केले. बेळगाव भूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. सिद्धराम महास्वामी यांनी आशीर्वचन केले. यावेळी डॉ. बसवराज जगजंपी यांचे भाषण झाले. आर. एम. करडीगुद्दी यांनी आभार मानले.