प्रतिनिधी /फोंडा
कवळे ग्रामपंचायतच्या प्रभाग 6 मधील नागरिकांच्या आरोग्याची दक्षता घेत चतुर्थीपुर्वी लोकवस्तीजवळ असलेल्या गटारात व परिसरात डांस प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात आली. कवळे पंचायतीचे नवनिर्वाचित पंचसदस्या सुषमा संतोष नाईक यांनी याकामी पुढाकार घेतला.
कवळे येथील प्रभाग 6 मधील मातृछाया ते वामनेश्वर मंदिर पेड, तसेच ढवळी परिसरात रस्त्याच्याकडेला वाढलेली झुडपे कापून स्वच्छ करण्यात आली. ढवळी ते कपिलेश्वरी येथील पुरव हे बेताळ देवाचे पेड स्वच्छ केले. डेंग्यू सारख्या साथीच्या रोग ऐन चतुर्थीच्या काळात डोके वर काढू नये यासाठी प्रभागातील परिसरात जंतूनाशक फवारणीही करण्यात आली. तसेच व्हॉटसऍप् गुपद्वारे ग्रामस्थाना आपल्या परिसरातील समस्या जाणून घेण्यात येणार आहे. नवनिर्वाचित पंचसदस्याच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.