Tarun Bharat

द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी

Advertisements

विधानसभेत अभिनंदन ठरावावर वक्त्यांचे गौरवोद्गार

प्रतिनिधी / पणजी

जीवन प्रवास कितीही खडतर असला तरी समाजाप्रती आस्था आणि जनसेवा हेच व्रत स्वीकारून त्याच तळमळीने काम केल्यास कोणतीही व्यक्ती सर्वोच्चपदापर्यंत पोहोचू शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे द्रौपदी मुर्मू या आहेत. भारताच्या सर्वोच्चपदी पोहोचलेल्या या स्त्रीचा जीवन प्रवास हा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात गोवा विधानसभेत राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिनंदन करण्यात आले.

आमदार दाजी साळकर यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. त्यावर बोलताना मंत्री गोविंद गावडे, सुदिन ढवळीकर, रवी नाईक, माविन गुदिन्हो, दिव्या राणे, मायकल लोबो, दिगंबर कामत, उल्हास तुयेकर आदीनी राष्ट्रपती मुर्मू यांच्या जीवनप्रवासातील अनेक पैलू मांडले.

ओरिसा राज्यातील एका दुर्गम भागात अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुर्मू यांनी अत्यंत कष्टांनी उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर सरकारी नोकरीही मिळविली. परंतु त्यांच्यातील समाजसेवक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे त्यांनी मुलांना मोफत शिकविण्यास प्रारंभ केले. त्यातून एक शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती झाली. पुढे त्याच लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी पालिकेची निवडणूक लढविली व  नगरसेवक बनल्या. पुढे त्या आमदार म्हणून विजयी होऊन मंत्रीपदही प्राप्त झाले. त्यांच्या आदर्श कार्यामुळे पुढे त्यांना झारखंडच्या राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. आज त्या थेट राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचल्या आहेत, असे गौरवोद्गार या वक्त्यांनी काढले.

दरम्यान, नंतरच्या सत्रात विधानसभेत अन्य काही मान्यवरांचेही अभिनंदन करण्यात आले. त्यात खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धामधील दैदीप्यमान सहभागासाठी यश पाडलोसकर, निरल वाडेकर, फर्झीन मोलिंजिक्कल, आश्नी सरमळकर, यशिका चेवली, मनस्वी दास, शिवन देसाई, मुष्ठियोद्धा निखत झरीन, यांचा समावेश होता.

त्याशिवाय आऊटलूक रिस्पॉन्सिबल टुरिझमचा सुवर्ण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बी-लिव्ह चे संस्थापक समर्थ खोलकर आणि संदीप मुखर्जी यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच ’वाघ्रो’ या लघुपटास कान महोत्सवात प्रवेश मिळाल्याबद्दल साईनाथ उसकईकर, ’द फर्स्ट व्हेडिंग’ साठी पुरस्कार मिळाल्याबद्दल अक्षय पर्वतकर, कोकणीला गुगलमध्ये पोहोचविण्यात योगदान देणारे संजीत हेगडे देसाई, 100 कोकणी अल्बमची निर्मिती करणारे एडविन डिकॉस्टा आणि आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनात फोटोला स्थान मिळाल्याबद्दल पर्वरी येथील सलोनी कामत जैन यांचेही अभिनंदन करण्यात आले.

Related Stories

सत्तरीतील मुलांनी शिकायचे कसे?

Patil_p

पाचशे चौ.मी.भूखंडातील बांधकामास दिलासा

Amit Kulkarni

राज्यात दर्जेदार पर्यटक प्राप्त करण्यासाठी स्थानिक व्यवसायांकडून प्रयत्न आवश्यक- मुख्यमंत्री

Amit Kulkarni

काणकोणात नगराध्यक्ष- उपनगराध्यक्षपदांसाठी रस्सीखेच

Amit Kulkarni

काँग्रेसकडून उद्या म्हापशात ‘महागाईचा नरकासुर वध’ आंदोलन

Amit Kulkarni

मांद्रे नाईकवाडा सरकारी प्राथमिक शाळेत ऑनलाईन स्पर्धा

Patil_p
error: Content is protected !!