Tarun Bharat

द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपतीपदाची घेतली शपथ


द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपतीपदाची शपथ आज घेतली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात भारताचे सरन्यायाधीश रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना शपथ दिली. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. त्यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.यावेळी त्या पहिलं अभिभाषण करताना भावूक झाल्याच्या पाहायला मिळाल्या.

अभिभाषणात काय म्हणाल्या द्रौपदी मुर्मूद्रौपदी मुर्मू आपल्या भाषणात म्हणाल्या, ‘स्वतंत्र भारतात जन्मलेली मी देशाची पहिली राष्ट्रपती आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून आपल्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला या अमृत कालामध्ये वेगाने काम करावे लागेल. या 25 वर्षांत अमृतकाल प्राप्तीचा मार्ग दोन मार्गांवर पुढे जाईल – प्रत्येकाचे प्रयत्न आणि प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

राष्ट्रपतीपदाची जबाबदारी मोठी आहे. देशाच्या सर्वाच्च पदावर निवडून दिल्याबद्दल आभार मानते. मी स्वतंत्र भारतात जन्मलेली पहिली राष्ट्रपती आहे. पुढील काळात गतीने काम करणार आहे. गरीब जनता स्वप्न बघू शकते, ती सत्यात आणू शकते .जनतेचं कल्याण हेच माझ ध्येय. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करणार. आजवर अनेक महिलांकडून देशहिताचं कार्य पार पडलं आहे. देशहिताचं कार्य करणाऱ्या महिला माझा आदर्श आहेत. कोरोना काळात भारताची ताकद जगाला दिसली. कोरोना संकटाविरूध्द आपण सक्षमपणे लढा दिला आहे. या काळात भारताने जगाला मदत केली. जग भारताकडे मोठ्या आशेने पाहतंय.शाकाहरी असल्याने राजभवनात मांस शिजवण्यावर बंदी आणणार असल्य़ाचे त्या म्हणाल्या.

महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी

जन्म-२० जून १९५८

वय-६४

जन्मस्थळ– उपरबेडा, जिल्हा-मयूरभंज ओडिशा.

शिक्षण– रामादेवी महिला काॅलेजमधून पदवी.

पेशा-
१)सिंचन आणि वीज वविभागात ज्यूनियर असिस्टंट क्लार्क होत्या.
.२) रायरंगपूरच्य़ा श्री अरबिदो इंटेग्रल एज्युकेशन सेंटरमध्ये मानद शिक्षक.

विवाह- १०८० मध्ये श्यामचरण मुर्मू यांच्याशी विवाह.

कुटुंब- दोन मुलं आणि एक मुलगी. पतीही सामाजिक कामात अग्रेसर.

आघात- १९८४ साली तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला.
२०१० मध्ये मुलगा लक्ष्मणचा २५ व्या वर्षी मृत्यू झाला.
२०१३ मध्ये दुसरा मुलगा बिरंचीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.
२०१४ मध्ये पती श्याम यांचा मृत्यू झाला.

समाजकार्य
पतीच्या मृत्यूनंतर घराचं रुपांतर शाळेत केलं. आयुष्य़ सामाजिक कामाला वाहिलं.

राजकारण
१९९७ मध्ये राजकीय प्रवास सुरु.
रायरंगपूरमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या.
२००० मध्ये विधानसभा लढवली आमि मंत्री बनल्या.
२००७ मध्ये ओडिशा विधानसभेच्या सर्वश्रेष्ठ आमदार म्हणून नीलकंठ पुरस्कार जाहीर झाला.
परिवहन, वाणिज्य., पशुपालन खाती सांभाळली.
२००९ मध्ये रायरंगपूरमध्ये पुन्हा आमदार झाल्या.
भाजपच्या अनुसिचित मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि अध्यक्ष
२०१३ मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत एसटी मोर्चाच्या सदस्य
सर्वाधिक काळ राज्यपालपदावर विराजमान राहण्याचा विक्रम नोंदवला.
झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल.

योगदान
जमशेदपूरमध्ये महिला विद्यापीठ स्थापनेसाठी प्रयत्न.
शाकाहरी असल्याने राजभवनात मांस शिजवण्यावर बंदी.

Related Stories

जम्मू विमानतळावर दोन स्फोट

datta jadhav

अयोध्येत महिला बँक अधिकाऱ्याची आत्महत्या, IPS अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल

Archana Banage

‘मविआ’च्या महामोर्चाला अटीशर्थींसह परवानगी

datta jadhav

हिमाचल प्रदेशात पशु चिकित्सा सहाय्यकांच्या 120 पदांची होणार भरती

Tousif Mujawar

भारत आणि दक्षिण अफ्रिका टी-20 मालिका उद्यापासून

Rohit Salunke

स्टोन क्रशरला परवानगी देऊ नये ;कलंबिस्त ग्रामस्थांचे निवेदन

Anuja Kudatarkar