Tarun Bharat

द्रौपदी मुर्मू आज अर्ज भरणार

पंतप्रधान मोदीही प्रस्तावक : राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी दिल्लीत दाखल

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

झारखंडच्या माजी राज्यपाल आणि एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ओडिशामधून गुरुवारी त्या दिल्लीत दाखल झाल्या असून येथे त्यांचे प्रशासकीय शिष्टाचारात स्वागत करण्यात आले. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी ओडिशातील एका संक्षिप्त निवेदनात मुर्मू यांनी, ‘मी सर्वांचे आभार मानते आणि राष्ट्रपती निवडणुकीसाठी मला सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. मी 18 जुलैपूर्वी सर्व मतदारांना (खासदारांना) भेटेन आणि त्यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करेन’ असे स्पष्ट केले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी तयार करण्याची प्रक्रिया गुरुवारी सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्ये÷ मंत्री राजनाथ सिंग, अमित शहा आणि जे. पी. नड्डा हे त्यांच्या प्रस्तावकांमध्ये असतील. तसेच अन्य केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्ये÷ नेत्यांनी प्रस्तावक आणि समर्थक म्हणून जोशी यांच्या निवासस्थानी कागदपत्रांवर स्वाक्षऱया केल्या. बिजू जनता दलाचे (बीजेडी) संमित पात्रा यांचाही या कागदपत्रांवर स्वाक्षरी करणाऱयांमध्ये समावेश आहे. मुर्मू हय़ा रालोआच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी अपेक्षा आहे.

ओडिशाचा सत्ताधारी पक्ष बिजू जनता दल (बीजेडी) आणि बिहारच्या जनता दल युनायटेडने (संजद) द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे 16 व्या राष्ट्रपती म्हणून मुर्मू यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यांनी निवडणूक जिंकली तर त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि या पदावर असणाऱया दुसऱया महिला असतील.

‘ओडिशा की बेटी’ला पटनायकांचा पाठिंबा

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या नामांकन अर्जावेळी उपस्थित राहण्याची विनंती केली. मात्र, पटनायक हे सध्या इटलीच्या दौऱयावर असल्याने त्यांनी आपले दोन मंत्रिमंडळ सहकारी जगन्नाथ सरका आणि तुकुनी साहू यांना द्रौपदी मुर्मूंच्या नामनिर्देशनपत्रावर स्वाक्षरी करण्यास आणि नामांकनाच्या वेळी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. बीजेडीने मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.

यशवंत सिन्हांचा 27 रोजी उमेदवारी अर्ज

विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा 27 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांना 13 विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे. राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी 29 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून 21 जुलैला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.

Related Stories

जागतिक प्रश्नमंजुषेत हैदराबादचा अभियंता विजेता

Patil_p

देशात 2.22 लाख संक्रमितांची नोंद

datta jadhav

पश्चिम बंगालमध्ये बालिकांवरही अत्याचार

Patil_p

काश्मीरमध्ये अधिकाऱ्यांवर बेधडक कारवाई

Patil_p

आंतरखंडीय क्षेपणास्त्राची उत्तर कोरियाकडून चाचणी

Patil_p

पंजाबच्या राजकारणात नवे समीकरण

Patil_p
error: Content is protected !!