ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ने बेंगळुरात एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये फ्लाइट कंट्रोल सिसटिमसाठी ४५ दिवसात ७ मजली इमारत उभा केली. गुरुवारी अधिकाऱ्यांनी याबाबाबत माहिती दिली. दरम्यान, देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन होणार आहे. या सात मजली इमारतीत भारतीय हवाई दलासाठी लढाऊ विमाने तयार करम्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सुविधा असणार आहे.
दरम्यान, एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, DRDO ने ADE, बेंगळूर येथे उड्डाण नियंत्रण प्रणालीसाठी हायब्रीड तंत्रज्ञानाद्वारे बहुमजली इमारतीचे बांधकाम विक्रमी ४५ दिवसांत पूर्ण केल्याचे सांगितले. तसेच ही इमारत अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रकल्पांतर्गत लढाऊ विमाने आणि फ्लाइट कंट्रोल सिस्टमसाठी नवीन मानकं विकसित करणं सुलभ करेल, असंही ते म्हणाले.
संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सांगितले होते की, AMCA च्या डिझाईन आणि प्रोटोटाइप विकासासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची (CCS) मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवारी या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.