परिसरात दुर्गंधी : दुरुस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहर व उपनगरातील डेनेज वाहिन्या घालण्यासाठी लाखो रुपयाची उधळपट्टी केली जाते. तरीदेखील डेनेज तुंबण्याचे प्रकार सुरूच आहेत. एसपी ऑफिससमोरील स्मार्ट रस्त्यावर अबकारी खात्याच्या कार्यालयाजवळ डेनेज चेंबर तुंबल्याने तो ओsव्हरफ्लो होत आहे. याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार करूनही याची दखल घेण्यात आलेली नाही. तरी सदर ड्रेनेज वाहिनीची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
डेनेज चेंबरच्या देखभालीकरिता महापालिका प्रशासनाने विशेष कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. डेनेज वाहिन्यांच्या दुरुस्तीकरिता तसेच डेनेज वाहिन्या घालण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्ची घातला जातो. पण समस्या जैसे थे आहेत. शहराच्या विविध भागातील डेनेज चेंबर नेहमीच ओव्हरफ्लो होत असतात. स्मार्ट सिटी निर्माण करण्यासाठी कोटीचा निधी खर्च करण्यात आला आहे. पण स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱया समस्यांचे निवारण करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे स्मार्ट रोडशेजारील ड्रेनेज वाहिन्या तुंबल्या आहेत. अबकारी खात्याच्या कार्यालयाजवळ डेनेज चेंबर तुंबून वाहण्याचा प्रकार सुरू आहे. सदर चेंबरद्वारे महिन्यापासून सांडपाणी वाहत आहे. महापालिका कार्यालयामागील बाजूस असलेल्या समस्येचे निवारण करण्यात आले, पण तुंबलेली डेनेज वाहिनी दुरुस्ती करण्याची तसदी महापालिकेच्या अधिकाऱयांनी घेतली नाही. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील रहिवाशांना याचा त्रास होत आहे. परिसरात विविध रुग्णालये असल्याने रुग्णांची गर्दी असते. त्यामुळे आरोग्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांचे आरोग्यदेखील धोक्मयात आले आहे.