परिसरात दुर्गंधी : दुरुस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कला मंदिर रोड, टिळकवाडी येथे रस्त्यावरून डेनेजचे पाणी वाहत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱया नागरिकांवर हे पाणी उडत आहे. या पाण्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्मयता असल्याने याची दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत.
डेनेजच्या वाहिनीला गळती लागल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे. कला मंदिर परिसरात अनेक कॉर्पोरेट कार्यालये, हॉटेल असल्याने या दुर्गंधीचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे. रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने भरधाव ये-जा करणाऱया वाहनांमुळे सांडपाणी अंगावर उडत आहे. यामुळे वादावादीचे प्रकार घडत आहेत.
शहराच्या मुख्य भागात अशाप्रकारे सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या कर्मचाऱयांना कळवूनदेखील दुर्लक्ष करण्यात येत आहे. सांडपाण्याची गळती न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.