Tarun Bharat

पाच किलो हेरॉईनसह शेतात सापडले ड्रोन

पंजाब-तरनतारनमध्ये बीएसएफ-पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेला यश

चंदीगढ / वृत्तसंस्था

पंजाबमधील तरनतारन येथील शेतात पुन्हा एकदा ड्रोन सापडले आहे. सदर ड्रोन जप्त करण्यात आले असून त्याच्यासोबत पाच किलो हेरॉईनही सापडले आहे. हे हेक्सा कॉप्टर ड्रोन असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी शेअर केली आहे. त्याच्यासोबत 5 किलो हेरॉईनची खेप बांधण्यात आली होती. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 35 कोटी रुपये आहे. सदर अमली पदार्थ तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

तरनतारनमधील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर पंजाब पोलीस आणि बीएसएफच्या संयुक्त पथकाने पुढील कारवाई सुरू केली आहे. डीजीपी गौरव यादव यांनीही ट्विट करून ड्रोनच्या जप्तीसंबंधीची माहिती दिली आहे. तरनतारनच्या सीमावर्ती भागात पंजाब पोलीस आणि बीएसएफने संयुक्त शोधमोहीम राबविल्याची माहितीही त्यांनी दिली. जप्त करण्यात आलेले ड्रोन सीमेजवळील शेतात कोसळलेले आढळून आले. यानंतर ड्रोन ताब्यात घेण्यात आले. ड्रोनचे कोणतेही नुकसान झालेले नाही. बॅटरी संपल्याने ड्रोन शेतात उतरल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

यापूर्वी तरनतारनमधील वान गावात गुरुवारी शेतात क्रॅश झालेले ड्रोन सापडले होते. शेतकऱयाची नजर या ड्रोनवर पडल्यानंतर ते ताब्यात घेण्यात आले. हे ड्रोन पूर्णपणे तुटले होते. याच्या दोन दिवसांपूर्वी अमृतसर आणि तरनतारनमध्ये बीएसएफ जवानांना एकाच रात्री दोन ड्रोन पाडण्यात यश आले होते. कारवाईनंतर सर्व ड्रोन फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवली जात आहेत.

Related Stories

एसबीआयच्या गृहकर्ज व्याजदरात कपात

Patil_p

तृणमूल नेते अनुव्रत मंडल यांना सीबीआयकडून अटक

Amit Kulkarni

भारतीय कंपन्यांचे 19 अब्ज डॉलर्सचे व्यवहार

Patil_p

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानांना 2 ऑक्टोबरपर्यंत दुबईत नो एन्ट्री

Patil_p

बिहार-ओडिशासाठी भाजपचे उमेदवार जाहीर

Patil_p

पॅरालिम्पिकमध्ये भारत 24 व्या स्थानावर

datta jadhav