सलग आठव्या सत्रात घसरण: सेन्सेक्स 326 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील चालू आठवड्यातील दुसऱ्या दिवशी मंगळवारी ऑईल अॅण्ड गॅस, औषधासह बँकिंग यांच्या समभागात विक्री झाल्याच्या परिणामामुळे भारतीय बाजार सलग आठव्या सत्रातही नुकसानीसोबत बंद झाला आहे. दिवसभरातील कामगिरी दरम्यान सकाळच्या सत्रात काहीसा मिळताजुळता कल राहिल्याने जागतिक पातळीवरील संकेतामुळे गुंतवणूकदारांनी विक्री केल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. जागतिक स्थितीचा अंदाज घेतल्याने देशातील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. याचा फटका हा भारतीय बाजारातील कामगिरीला बसल्याची नेंद करण्यात आली.
बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 326.23 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक चार टक्क्यांनी खाली घसरुन 58,962.12 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर88.75 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 17,303.95 वर बंद झाला आहे.
भारतीय भांडवली बाजारातील मंगळवारची राहिलेली घसरण ही सलग आठवी घसरण राहिल्याची नोंद केली आहे. यामध्ये प्रमुख दोन निर्देशांकांमध्ये घसरण राहिली. मागील तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच दोन प्रमुख निर्देशांकात इतकी मोठी घसरण राहिली आहे.
सेन्सेक्समधील समभागांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वाधिक दोन टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, एनटीपीसी, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, टायटन, अॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्स यांचेही समभाग प्रभावीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, पॉवरग्रिड कॉर्प, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोर्ट्स आणि एचडीएफसी यांचे समभाग मात्र तेजीसह बंद झाले आहेत. आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाची कोस्पी, जपानचा निक्की आणि चीनचा शांघाय कम्पोझिट हे तेजीत राहिले. तर हाँगकाँगचा हँगसेंग हा घसरणीत राहिला आहे. युरोपीयन बाजारात दुपारपर्यंत घसरण राहिली होती.