Tarun Bharat

दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत 19 लाखांचा ड्रग्ज जप्त

Advertisements

प्रतिनिधी/ पणजी

अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) हडफडे आणि कळंगूट अशा दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे 19 लाख 20 हजार रुपये किमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली आहे. दोन्ही संशयितांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये मनोज श्रीकृष्णा राठोड (उत्तरप्रदेश) व रिचर्ड रॉबिन्सन जॉन्सन (पश्चिम आफ्रिका) यांचा समावेश आहे. कळंगूट भागात मोठय़ा प्रमाणात ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती एएनसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गेल्या कित्येक दिवसांपासून पोलीस ड्रग्ज विक्रेत्यांना जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र प्रत्येकवेळी पोलिसांना रिकाम्या हातानेच परतावे लागत होते.

शुक्रवार 26 रोजी एएनसी पोलीस हडफडे येथे गस्तीवर गेले असता त्यांना   मनोज राठोड हा संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळून आले. संशयित ड्रग्ज विकण्यासाठी ग्राहकांच्या शोधात होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची सखोल तपासणी  केली असता त्याच्याकडे 20 ग्रॅम एम्फटामाईन व 20 ग्रॅम हेरॉईन असा सुमारे 4 लाख 20 रुपये किमतीचा ड्रग्ज सापडला. पोलिसांनी त्वरित पुढील कारवाई करून संशयिताला अटक केली.

संशयित मनोज राठोड याला पोलीस कोठडीत घेतल्यानंतर त्याची सखोल उलट तपासणी केली असता संशयित रिचर्ड याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरित आपला मोर्चा कळंगूटच्या दिशेने वळविला. परबवाडा-कळंगूट येथे छापा मारून संशयित रिचर्ड जॉन्सन याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून 40 ग्रॅम एमडीएमए, 60 ग्रॅम हेरॉईन व 50 ग्रॅम इपॅस्टीकसी पावडर असा एकूण सुमारे 15 लाख रुपये किमतीचा ड्रग्ज जप्त करण्यात आला. दोन्ही संशयितांना पोलीस कोठडीत  पाठविण्यात आले असून एएनसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

एएनसी उपअधीक्षक नेलॉर्न आल्बुकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अरुण देसाई, उपनिरीक्षक रोहन मडगावकर, मंजुनाथ नाईक, महिला उपनिरीक्षक प्रियांका गारोडी, हवालदार सचिन सावंत, कॉन्स्टेबल रुपेश खांडोळकर, संदेश वळवईकर, नितेश मुळगांवकर, मंदार नाईक व चालक अनंत राऊत यांनी कारवाई केली आहे. एएनसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

केरी सत्तरी पंचायतक्षेत्रात गढूळ पाणीपुरवठा

Amit Kulkarni

क्रांतिदिन मर्यादित स्वरुपात

Amit Kulkarni

सरकारकडून महामारीच्या काळात ‘डेन्टल’ विद्यार्थ्यांना लुटण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni

ब्रह्मेशानंदाचार्यांना पद्मश्री प्रदान

Amit Kulkarni

खोल बेताळ देवस्थानचा आज वार्षिक जत्रोत्सव

Amit Kulkarni

पांडुरंग राऊत यांचे निधन

Amit Kulkarni
error: Content is protected !!