एका स्थानिक संशयिताला अटक
पणजी : अमलीपदार्थ विरोधी विभागाने म्हापसा येथे केलेल्या कारवाईत 6 लाख ऊपये किमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणी एका स्थानिक संशयिताला अटक केली असून त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या संशयिताचे नाव अनिल रघुवीर गडेकर (62, ज्योती अपर्टमेंट आल्त म्हापसा) आहे. संशयित ड्रग्ज प्रकरणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आणि त्याला रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून 6 ग्रॅम एम्फाटामाईन जप्त केला आहे. एएनसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.