एका संशयिताला अटक : सीआयडीने केली कारवाई
प्रतिनिधी /पणजी
गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) शिवोली येथे केलेल्या कारवाईत 1 लाख 56 हजार रुपये किमंतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक केली असून त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव अब्दूल्ला कुनहियालिब्बा बरदिला (51) असे आहे. संशयित मुळ कर्नाटकातील असून तो शिवोली येथे राहत होता. संशयित ड्रग्ज व्यवसाय करीत असल्याची माहिती सीआयडी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी संशयित राहत असलेल्या खोलीवर छापा मारून संशयिताला रंगेहात अटक केली. त्याच्याकडून 12.64 ग्रॅम कोकीन व 3.82 ग्रॅम एमडीएमए जप्त केला आहे. सीआयडी निरीक्षक नितीन हळर्णकर व त्यांच्या टीमने ही कारवाई केली असून पुढील तपास करीत आहेत.