ऑनलाईन टीम/तरुण भारत
चेन्नई विमानतळावर (airport) सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई कारवाई केली आहे. या कारवाईत सीमा शुल्क विभागाने १०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले. इथोपियातून आलेल्या एका विमान प्रवाशाकडून ९.५९० किलो वजनाचे कोकेन आणि हेरॉईन जप्त केले आहे. या अंमली पदार्थांची किंमत बाजारात १०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. इथिओपियाच्या आदिस अबाबा येथून शुक्रवारी चेन्नईला आलेल्या इथिओपियन एअरलाइन्सच्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. दरम्यान या तपासणीत इक्बाल बी उरंदडी या ३८ वर्षीय भारतीय प्रवाशाकडून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) अधिकारी अनिल कुमार यांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. चेन्नई एअर कस्टम्सनं (Chennai Air Customs) जारी केलेल्या निवेदनानुसार, इक्बाल बी. उरंदादी या भारतीय प्रवाशाला ११ ऑगस्ट रोजी इथिओपियन एअरलाइन्सनं विमानतळावर रोखलं. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडून ९.५९० किलो वजनाचे हेरॉईन आणि कोकेन जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे.
किती किलोचे सापडले अमली पदार्थ?
सीमा शुल्क विभागाने चौकशी केल्यानंतर जवळपास साडे नऊ किलोचे कोकेन आणि हेरॉईन अधिकाऱ्यांना सापडले आहे. तसेच इक्बालची कसून चौकशी केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. एनडीपीएस कायद्यानुसार हा सर्व माल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, जुलै महिन्यात एका टांझानियन प्रवाशाकडून ८.८६ कोटींचे हेरॉईन चैन्नई विमानतळावरच जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता ऑगस्टमध्ये ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.