Tarun Bharat

तालुक्यात दुर्गादौडमुळे शिवमय वातावरण

Advertisements

बस्तवाड, हलगा, कोंडसकोप, तारीहाळ या भागात बालचमुंसह मुली-महिलांचा देखील मोठा सहभाग

वार्ताहर /हलगा

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान आयोजित दुर्गामाता दौडला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद लाभत आहे. दौडमध्ये युवक व युवती मोठय़ा संख्येने सहभागी होत आहेत. बस्तवाड, हलगा, कोंडसकोप, तारीहाळ आदी भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

विभाग प्रमुख प्रसाद धामणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारपासून दुर्गा दौडला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी शिवमूर्तीचे पूजन चेअरमन सदानंद बिळगोजी यांच्या हस्ते पूजा केली. ध्वजारोहण बागेवाडी पोलीस स्टेशनचे सीपीआय सिन्नूर यांनी केले. प्रत्येक गल्लीत आकर्षक रांगोळय़ा, आकर्षक देखावे, कमानी तसेच संपूर्ण गल्ल्या भगव्यामय करून सोडल्या होत्या. दौड मरगाई गल्ली, लक्ष्मी गल्ली, नवी गल्ली, बसवाण गल्ली, तानाजी गल्ली, महावीर गल्ली, पाटील गल्लीतून काढण्यात येते.

बस्तवाड येथे प्रतिसाद

बस्तवाड येथेही विविध देवतांचे पूजन करून महाराजांच्या मूर्तीकडे सांगता करण्यात आली. प्रत्येक दिवशी विविध गल्ल्यांमध्ये दौड काढण्यात येते. गणपती गल्ली, शिवाजी गल्ली, साईनगर, होळी गल्ली, ताशिलदार गल्ली, तानाजी गल्ली, नेताजी गल्ली, संभाजी गल्ली या सर्व भागातून दौड काढण्यात येते.

बाळेकुंद्री खुर्द येथे वाढता प्रतिसाद

बाळेकुंद्री खुर्द येथे दौडला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून दौडमध्ये सहभागी बालचमू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. दररोज दौडची सुरुवात एका गल्लीतून करण्यात येत असून त्याच गल्लीत सांगताही करण्यात येत आहे. सोमवारी सुभाष गल्ली येथून दौडला प्रारंभ करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर प्रेरणामंत्राने दौडला प्रारंभ केला. त्यानंतर दौड लक्ष्मीनगर, मेन रोड, मठ गल्ली, बसवाण गल्ली, लक्ष्मी गल्ली, पाटील गल्ली, जाधव गल्ली, कलमेश्वर गल्ली, कामाण्णा गल्लीमार्गे पुन्हा सुभाष गल्ली येथे आल्यानंतर ध्येयमंत्राने सांगता केली. दौडमध्ये तरुण-तरुणींसह बालचमूंची संख्याही अधिक आहे. स्फूर्तिगीते गात दौडमधून धर्माभिमान जागविण्यात येत आहे. दौडचे प्रत्येक  गल्लीमध्ये आरती ओवाळून स्वागत करण्यात येत आहे.

मण्णूरमध्ये नवचैतन्य

हिंडलगा ः मण्णूर येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदवी स्वराज्य युवा संघटनेतर्फे आयोजित दुर्गामाता दौडला युवक, युवती व महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दौडमध्ये तरुण व तरुणींचा लक्षणीय सहभाग दिसून येत आहे. स्वागतासाठी प्रत्येक गल्लीला भगवे ध्वज आणि पताका लावून सजविण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.गावातील प्रत्येक गल्लीसह आंबेवाडी, गोजगे, हिंडलगा, विजयनगर आदी भागातून दौड काढली जात आहे. याठिकाणी पुष्पवृष्टी व फटाक्मयांची आतषबाजी करून दौडचे जल्लोषात स्वागत केले जात आहे. दरम्यान गावातील सर्व मंदिरांमध्ये पूजन करून ध्येयमंत्राने सांगता होत
आहे.

कडोलीत दौडचे जल्लोषी स्वागत

येथे काढण्यात येत असलेल्या श्री दुर्गामाता दौडचे जल्लोषात स्वागत केले. सोमवारी विविध युवक संघांच्या पूजा-अर्चा आणि घोषणांनी गाव दणाणून सोडले. येथील सावकार गल्ली आणि अयोध्या नगरवासियांतर्फे शिवपूजन करून आणि आरती ओवाळून सुवासिनींनी दौडचे स्वागत केले.

नामफलकाचे अनावरण

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री दुर्गामाता दौडचे औचित्य साधून गावच्या पश्चिमेला उदयास येत असलेल्या नवीन वसाहतीमध्ये ता. पं. सदस्य उदय सिद्दण्णावर यांच्या हस्ते शिवाजीनगर नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी शिवभक्त, कार्यकर्ते उपस्थित होते.

हुदलीत यंदा प्रथमच दौडला प्रारंभ

हुदली (ता. बेळगाव) येथे यावषीपासून श्री दुर्गामाता दौडला प्रारंभ केला असून दररोज दौडमध्ये 300 हून अधिक कार्यकर्ते सहभागी होत आहेत. गावामध्ये दौड सुरू करण्यात यावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यानुसार आठ दिवसांपूर्वी गावामध्ये बैठक घेतली. बैठकीला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, विश्वनाथ पाटील, प्रवीण मुरारी, विनायक पाटील, मारुती मुचंडीकर व कल्लाप्पा पाटील उपस्थित होते. बैठकीत दुर्गामाता दौड सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून कार्यकर्त्यांना सविस्तर माहिती दिली. दररोज दौडमध्ये सहभागी होणाऱया कार्यकर्त्यांची संख्या वाढत आहे. दौडमध्ये विविध देव-देवतांच्या घोषणा देण्यात येत आहेत. स्फूर्तिगीतेही गाण्यात येत आहेत. त्यामुळे गावात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.

हंदिगनूर, मण्णीकेरीत उत्तम प्रतिसाद

हंदिगनूर येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे सुरू असलेल्या दुर्गामाता दौडला चलवेनट्टी, मण्णेकेरी, बोडकेनट्टी, म्हाळेनट्टी आदी गावांतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हंदिगनूर येथील छ. शिवाजी चौक येथील शिवपुतळय़ापासून दररोज सकाळी 6 वा. पेरणा मंत्राने दौडला प्रारंभ होत आहे. गावातून दौडचे भव्य स्वागत करण्यात येत आहे. परिसरातील प्रत्येक गावात सुवासिनी आरती ओवाळून आणि पृष्पवृष्टी करून दौडचे स्वागत करीत आहेत. शिवपुतळय़ाजवळ आल्यानंतर ध्येयमंत्राने दौडची सांगता करण्यात येत आहे. दौडीत युवावर्गासह बालचमूंचा मोठा सहभाग दिसून येत आहे.

Related Stories

2500 हेक्टरात पामतेल लागवडीचे उद्दिष्ट

Omkar B

नैर्त्रुत्य रेल्वेत 7 महिला सबइन्स्पेक्टर दाखल

Patil_p

गुरुवारी धुमधडाक्यात उडाला लग्नांचा बार

Amit Kulkarni

भू-परिवर्तन-सिंगल लेआलाऊट बुडा बैठकीत मंजुरी

Amit Kulkarni

प्रबुद्ध भारत आयोजित स्टेप 2021 चर्चासत्र परिषदेला प्रारंभ

Patil_p

ल्युपस रोगाबाबत जागृती आवश्यक

Amit Kulkarni
error: Content is protected !!