Tarun Bharat

कपिलेश्वर तलावात सांडपाणी मिसळल्याने पाणी झाले दूषित

बेळगाव : कपिलेश्वर तीर्थ त्याला पवित्र तीर्थ म्हणून मानले जाते. या तलावांमध्ये गणेश विसर्जन करण्यात येत आहे. मात्र मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे सांडपाणी तलावात मिसळले. तलावातील संपूर्ण पाणी दूषित झाल्यामुळे दूषित पाण्यात विसर्जन कसे करायचे असा मुद्दा निर्माण झाला. महापालिकेच्या बेजबाबदारपणा बद्दल उसळली असून ड्रेनेज पाणी मिसळत असताना याबाबत खबरदारी का घेण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

कपिलेश्वर तलावांमध्ये सांडपाणी मिसळत असल्याचे तक्रारी अनेक वेळा करण्यात आल्या होत्या. मात्र गटारीचे बांधकाम महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते . पण महापालिकेच्या कामाचा नमुना मंगळवारी रात्री झालेल्या पावसात चव्हाट्यावर आला आहे. परिसरातील ड्रेनेज वाहिन्या तुंबल्याने कपिलेश्वर रोड आणि परिसरातील सांडपाणी तलावात मिसळत असल्याचे समोर आले आहे. गटारीचे तलावात मिसळत असल्याने त्याबाबत आवश्यक कारवाई करावी अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन कपिलेश्वर गटारी बांधण्यात आल्या होत्या. पण तलावात सांडपाणी जाऊ नये यादृष्टीने कोणत्या उपाययोजना आखण्यात आल्या नाही. परिणामी पावसाचे पाणी तलावात मिसळत आहे.

मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे सांडपाणी तलावामध्ये मिसळले. गणेशोत्सव असल्याने घरगुती श्री मूर्तींचे विसर्जन या तलावांमध् पक्षाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला ये करण्यात येते. दीड दिवस, पाच दिवस आणि सहाव्या दिवशी गौरी- गणपती विसर्जन करण्यात आले आहे. पण तलावात दूषित पाणी भाविकांच्या भावना दुखावल्या. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षा बद्दल संताप व्यक्त करण्यात आला. पाणी दूषित झाल्याने गणेश विसर्जनासाठी भाविकांना रामेश्वर तीर्थ येथे जावे लागले. तलावात सांडपाणी मिसळू नये यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, मागणी करण्यात आली.

मंगळवारी सकाळी झालेल्या पावसाचा जोर खूप होता. शहरातील बहुंताश इमारत धारकांनी टेरेस चे पाणी सांडपाणी वाहिनीला जोडले आहे. अशातच परिसरातील सांडपाण्याच्या वाहिन्या तुंबल्याने पाणी ओवरफ्लो होऊन रस्त्यावरून वाहत होते. तसेच तलावाच्या चारही बाजूच्या कठड्यांची उंची कमी असल्याने रस्त्यावरील पाणी तलावात मिसळले आहे. याबाबतची माहिती मिळताच तलावातील दूषित पाणी उपसा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. याकरिता पंप सुरू करण्यात आले असून बुधवारी सायंकाळपर्यंत तलाव स्वच्छ केला जाईल. पण या दरम्यान घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी फिरत्या वाहनाची सुविधा उपलब्ध केली असल्याची माहिती महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी दिली.

महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे कपिलेश्वर तलावात दूषित पाणी मिसळल्यामुळे भाविकांना गणपती विसर्जनाला अडथळा निर्माण झाला होता. कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव श्री. किरण जाधव यांच्या निदर्शनास ही बाब येताच किरण जाधव हे स्वतः कपिलेश्वर तलावाकडे जाऊन आणि भाविकांना जक्कीनहोंडा येथे गणपती विसर्जन करण्याची विनंती केली व तात्काळ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सदर घटनेची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी फोन उचलण्याची तसदी घेतली नाही त्यामुळे किरण जाधव यांनी तात्काळ बेळगावच्या जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सदर घटनेची कल्पना देऊन तात्काळ पर्यायी व्यवस्थेची मागणी केली आहे. तसेच नवीन कपिलेश्वर तलावात गणपती विसर्जनासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून द्या, जेणेकरून बेळगावच्या जनतेला अश्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तसेच कपिलेश्वर तलावाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हा आयुक्तांकडे किरण जाधव यांनी केली आहे.

Related Stories

वटपौर्णिमेचे व्रत मोठय़ा भक्तिभावाने

Amit Kulkarni

सातवीच्या पाठय़पुस्तकातून टीपू सुलतानचा धडा वगळला

Patil_p

कोरोनाच्या काळात पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे

Omkar B

एमएलआयआरसीमधून प्रशिक्षणार्थी जवान बेपत्ता

Tousif Mujawar

तेलसंग येथे 728 जिलेटिनच्या कांडय़ा जप्त

Amit Kulkarni

गाळय़ांचा लिलाव करण्याआधी सुविधा पुरवा

Patil_p
error: Content is protected !!