Tarun Bharat

आंदोलनाच्या धास्तीने मनपासमोर कडक पोलीस बंदोबस्त

Advertisements

माजी नगरसेवकांचे आंदोलन एक आठवडा लांबणीवर

प्रतिनिधी /बेळगाव

मराठी भाषेतून कागदपत्रे देण्यात यावीत, या मागणीकरिता माजी नगरसेवकांच्यावतीने महापालिकेला निवेदन देण्यात येणार होते. मात्र काही कारणास्तव हे आंदोलन एक आठवडा लांबणीवर टाकण्यात आले आहे. पण मराठी भाषिकांच्या आंदोलनाच्या धास्तीने पोलीस प्रशासनाने बुधवारी महापालिका कार्यालयासमोर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे मनपा कार्यालयात बंदोबस्ताचा विषय चर्चेचा ठरला होता.

मराठी भाषेतून कागदपत्रे देण्यासह सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेतील फलक लावण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन महापालिका कार्यालयासह विविध ठिकाणी मराठी भाषेतील फलक लावण्याची मागणी करण्यात येणार होती. बुधवार दि. 10 रोजी निवेदन देण्याचा प्रस्ताव होता. मात्र सदर आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे.

माजी नगरसेवक महापालिका कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ा तसेच गस्तीचे वाहन या ठिकाणी ठाण मांडून होते. महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सदर वाहने लावून बंदोबस्त ठेवला होता. तसेच येथील लाल-पिवळय़ा अनधिकृत ध्वजाच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दुपारी 1 वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्त हटविला नाही. मात्र निवेदन देण्याचा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बंदोबस्त मागे घेतला. सकाळी कार्यालय उघडण्यापूर्वीच पोलीस तैनात करून बंदोबस्त ठेवल्याने मनपा कार्यालयातील कर्मचाऱयांमध्ये चर्चा सुरू झाली. कोणत्या कारणास्तव इतका बंदोबस्त? अशी विचारणा करण्यात आल्यानंतर माजी नगरसेवकांच्या आंदोलनाबाबत माहिती उपलब्ध झाली.

Related Stories

कंटेन्मेंट झोनबाबत व्यापारी आणि जनता संभ्रमात

Patil_p

बेळगाव बेकर्स सोसायटीतर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरी

Amit Kulkarni

विविध अटींच्या बडग्याने पक्षकारांचे अतोनात हाल

Patil_p

हिंडलगा येथील दत्त मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात

Amit Kulkarni

खडेबाजारात आणखीन एका ठिकाणी गळतीद्वारे पाणी वाया

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंटही वसुल करणार विनामास्क फिरणाऱयांकडून दंड

Patil_p
error: Content is protected !!