दररोज पहाटे 5.30 वाजता स्मारकातून प्रारंभ : विविध मार्गावर दौडचे नियोजन
वार्ताहर /खानापूर
खानापूर शहरात यावषीही नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गादौडीचे आयोजन केले आहे. येथील श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानतर्फे सोमवार दि. 26 सप्टेंबर ते बुधवार दि. 5 ऑक्टोबरपर्यंत दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.
रोज पहाटे 5.30 वाजता येतील छ. शिवाजी महाराज चौकातून सुरुवात होणार आहे. शहरातील विविध मार्गावरुन दौड काढण्यात येणार असून रोज एका ठिकाणी दौडची सांगता होणार आहे. दौड दि. 26 रोजी श्री शिवस्मारक, निंगापूर गल्ली, देसाई गल्ली, श्री विठ्ठल मंदिर, बेंदे खुट्ट, चिरमुरकर गल्ली, कडोलकर गल्ली, केंचापूर गल्ली, श्री चौराशी मंदिर, घाडी गल्ली, गुरव गल्ली, बस्ती गल्ली, श्री कलमेश्वर मंदिर, श्री सातेरी माऊली मंदिरात सांगता. दि. 27 रोजी शिवस्मारक, अश्रय कॉलनी, वर्दे कॉलनी, श्री गणपती मंदिर (हायवे ), श्री बसवेश्वर स्मारक, शिवाजीनगर, समर्थ नगर, श्री मन्याम्मा मंदिर, गांधीनगर, श्री दुर्गादेवी मंदिर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, हलकर्णी येथे सांगता. दि. 28 रोजी शिवस्मारक, निंगापूर गल्ली, श्री लक्ष्मी मंदिर, श्री ज्ञानेश्वर मंदिर, देसाई गल्ली, श्री विठ्ठल मंदिर, गुरव गल्ली, घाडी गल्ली, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक, बाजारपेठ, श्री बसवेश्वर मंदिर, श्री रवळनाथ मंदिराकडे सांगता. दि. 29 रोजी शिवस्मारक श्री मारुती मंदिर, रेल्वे स्टेशन, मन्सापूर, श्री रामलिंगेश्वर मंदिर असोगा येथे सांगता.
दि. 30 रोजी शिवस्मारक, हायवे, विद्यानगर, शाहूनगर, मिशनरी कंपाऊंड, स्टेशन रोड, पोलीस क्वॉर्टर्स, दुर्गानगर, के. एस. आर. पी. रोड, वाजपेयी नगर, श्री दुर्गादेवी मंदिराकडे सांगता होणार आहे.
दि. 1 ऑक्टोबर रोजी श्री शिवस्मारक, न्यु निंगापूर गल्ली, नागलिंगनगर, श्री लक्ष्मी नारायण मंदिर, घोडे गल्ली, श्री स्वामी समर्थ केंद्र, श्री दत्त मंदिर, अर्बन बँक श्री दुर्गादेवी, भट गल्ली, जुने मोटर स्टँड रोड, बालाजी मंदिर, रविवार पेठ, श्री लक्ष्मी गदगा, धौराशी गल्ली, श्री चौराशीदेवी मंदिर येथे सांगता. रविवार दि. 2 श्री शिवस्मारक, बुरुड गल्ली, केंचापूर गल्ली, श्री चौराशीदेवी मंदिर, पारिश्वाड क्रॉस, दादोबा नगर, फुलेवाडी, मुडेवाडी, हत्तरगुंजी श्री चव्हाटा मंदिरात सांगता. दि. 3 श्री शिवस्मारक, बुरुड गल्ली, लक्ष्मीनगर, न्यू नाईक गल्ली, नाईक गल्ली, केंचापूर गल्ली, कडोलकर गल्ली, श्री समादेवी मंदिरात सांगता. दि. 04 रोजी शिवस्मारक, रुमेवाडी क्रॉस, मारुती नगर, श्री मारुती मंदिर, पारिश्वाड क्रॉस, श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, कुप्पटगिरीत सांगता होणार आहे. बुधवार दि. 5 रोजी शिवस्मारक, निंगापूर गल्ली, श्री लक्ष्मा मंदिर, देसाई गल्ली, श्री विठ्ठल मंदिर, बेंदे खुट्ट, चिरमुरकर गल्ली, श्री ज्ञानेश्वर मंदिराकडे समाप्ती होणार आहे.
खानापूर शहर व परिसरातील शिवभक्त, धारकऱयांनी या दौडमध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठानने केले आहे.
चापगावात यंदापासून दुर्गादौड
येथे नवरात्रोत्सवानिमित्त यावषीपासून दुर्गादौडचे आयोजन करण्याचा निर्णय युवकांनी घेतला आहे. गावातील युवकांनी बैठक घेऊन नित्य कार्यक्रमाची रुपरेषा आखली आहे. येथील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळय़ापासून या दौडची सुरुवात होणार आहे.
सोमवार दि 26 रोजी पहाटे 5.30 वा. शिवरायांच्या प्रतिमा पूजनानंतर दुर्गामाता दौडला सुरुवात होणार आहे. रोज सकाळी 6 वाजता दौडीचे आयोजन केले असून यावषी गावातील प्रत्येक मंदिराजवळ दुर्गादौडची सांगता केली जाणार आहे. तरी गाव व परिसरातील युवावर्ग व माता-भगिनींनी या दुर्गादौडीत सहभागी व्हावे, असे आवाहन शिवप्रति÷ान युवावर्ग चापगावतर्फे करण्यात आले आहे. येथील दुर्गादेवी मंदिर व ग्रामदैवत श्री फोंडेश्वर मंदिरात घटस्थापना करण्यात येते. त्यानंतर 9 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
असोगा येथे दुर्गादेवी उत्सवाची जय्यत तयारी
असोगा ता. खानापूर येथील सार्वजनिक श्री दुर्गामाता युवक मंडळाच्यावतीने दरवषीप्रमाणे यावषीही दुर्गादेवी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सोमवार दि 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता दुर्गादेवी मूर्तीची मिरवणूक निघणार आहे. मूर्ती प्रति÷ापना झाल्यानंतर दसऱरापर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि 30 सप्टेंबर ते मंगळवार दि. 4 ऑक्टोबर रोजी ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजिला आहे. मंगळवार दि 4 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दुर्गादेवी युवक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.