Tarun Bharat

दुर्गामाता दौड : अधिकारी-पदाधिकाऱ्यांची बैठक

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

दुर्गामाता दौडच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलीस अधिकारी व शिवप्रति÷ान हिंदुस्थानच्या प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक झाली. मार्केट एसीपी कार्यालयात झालेल्या बैठकीत दौडसंदर्भात चर्चा झाली. यावेळी अधिकाऱयांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.

मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, खडेबाजारचे एसीपी ए. चंदाप्पा यांच्यासह शहरातील बहुतेक पोलीस निरीक्षक बैठकीला उपस्थित होते. शिवप्रति÷ानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे, विश्वनाथ पाटील, परशराम कोकितकर, पुंडलिक चव्हाण, आनंद चौगुले, अजित जाधव, प्रसाद हुन्सवाडकर आदींसह प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

दुर्गामाता दौडचा मार्ग व नियोजनासंदर्भात यावेळी चर्चा झाली. दौड उत्साहात व चैतन्यमय वातावरणात साजरी करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. यासाठी पोलीस दलाकडून सर्व सहकार्य असणार आहे, अशी ग्वाही अधिकाऱयांनी दिली. पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनीही मार्गदर्शन केले.

Related Stories

मास्क न घालणाऱयांना आता हजार रुपये दंड

Patil_p

मजगाव येथील ज्ञानेश्वरनगर सीलडाऊन

Patil_p

आंबेवाडीत मसणाई मंदिराचे भूमिपूजन

Patil_p

सिव्हिल हॉस्पिटलमधील जलशुध्दीकरण केंद्र बंद

Patil_p

रयत गल्लीतील पाणी समस्या सोडविण्यात यश

Amit Kulkarni

बुडाच्या अध्यक्षपदी गुळाप्पा होसमनी

Rohan_P
error: Content is protected !!