शिवप्रतिष्ठानचे प्रमुख भिडे गुरुजींची माहिती : खानापूर तालुक्मयातील 95 गावांमध्ये यावषीपासून नव्याने दुर्गामाता दौडीला प्रारंभ करणार
प्रतिनिधी /बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून यावषी भव्य स्वरुपात दुर्गामाता दौड आयोजित करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे दुर्गामाता दौडवर निर्बंध आले होते. परंतु, यावषी भव्य स्वरुपात दौड साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून खानापूर तालुक्मयातील 95 गावांमध्ये यावषीपासून नव्याने दौड सुरू केली जाईल, अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी यांनी रविवारी आयोजित बैठकीत दिली.
शिवप्रतिष्ठानतर्फे महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी रविवारी अनसूरकर गल्ली येथील छत्रेवाडा येथे बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत भिडे गुरुजींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. रायगड येथे पुनर्स्थापित केल्या जाणाऱया सुवर्ण सिंहासनासाठी शिवभक्तांनी सढळ हस्ते कर्तव्य निधी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर यावषीच्या दौडमध्ये देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी हजारोंच्या संख्येने बेळगावकरांनी सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी दुर्गामाता दौडच्या नियोजनाविषयी धारकऱयांना माहिती दिली. या बैठकीला शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, अजित जाधव, तालुकाप्रमुख कल्लाप्पा पाटील, तालुका कार्यवाह परशुराम कोकितकर, विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण, अनंत चौगुले, किरण बडवाण्णाचे, हिरामणी मुचंडीकर, गावप्रमुख, गल्लीप्रमुख यासह मोठय़ा संख्येने धारकरी उपस्थित होते.
खडय़ा पहाऱयासाठी गावोगावी प्रचार
सुवर्ण सिंहासनाच्या संरक्षणासाठी शिवप्रतिष्ठानने खडा पहारा ही योजना आखली आहे. यामुळे प्रत्येक शिवभक्ताला वर्षातून एक दिवस रायगड येथील शिवदरबारी सुवर्ण सिंहासनाला पहारा देता येणार आहे. यासाठी बेळगाव शहर व तालुक्मयामध्ये गावोगावी प्रचार केला जाणार आहे. 17 व 18 सप्टेंबर रोजी हा प्रचार होणार असून अधिकाधिक धारकऱयांनी खडय़ा पहाऱयासाठी नावनोंदणी करावी, असे आवाहन गुरुजींनी केले.