Tarun Bharat

यावषी प्रत्येक तालुक्यात दुर्गामाता दौडचे आयोजन

बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानवतीने यावषी भव्य दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्मयात ही दौड काढली जाणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांचे नियोजन सुरू असून, दौड यशस्वी करण्यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी रविवारी आयोजित बैठकीत केले.

अनसुरकर गल्ली येथील छत्रेवाडा येथे जिल्हास्तरीय बैठकीत दौडच्या नियोजनाविषयी चर्चा करण्यात आली. बेळगावसह खानापूर, हल्याळ, रामदुर्ग, निपाणी येथे दुर्गामाता दौड काढली जाणार आहे. जिल्हय़ातील इतर तालुक्मयांमध्येही दौड काढण्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा केली जात आहे. त्यामुळे यावषीची दौड भव्यदिव्य होणार आहे.

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी भिडे गुरुजींच्या प्रेरणेतून दुर्गामाता दौड काढली जाते. दौडमधून तरुणांना राष्ट्र निर्मितीचे शिक्षण दिले जाते. त्यामुळेच दरवषी मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. दौडमध्ये प्रत्येक हिंदू बांधवाने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील यांनी प्रत्येक तालुक्मयातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

अखेर कॅन्टोन्मेंटच्या पाणी समस्येवर तोडगा

Tousif Mujawar

खरेदीला उधाण, दक्षतेची गरज

Omkar B

स्वच्छतेचे काम करण्यास बीव्हीजीची तयारी

Amit Kulkarni

स्केचमधून साकारतोय तिच्या कलेचा आविष्कार

Amit Kulkarni

Kolhapur Breaking आजरा महागोंडवाडीत दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन, वनविभागाने दिला दुजोरा

Abhijeet Khandekar

सीमेवरील चेकपोस्ट नाक्यांवरून वाहने सुसाट

Amit Kulkarni