कंग्राळी बुद्रुक-गौंडवाड शिवप्रतिष्ठानच्या बैठकीत निर्धार : सोमवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
सोमवार दि. 26 पासून तालुक्मयामध्ये नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड येथे प्रतिवर्षाप्रमाणे दुर्गामाता दौड काढण्यासाठी शिवप्रतिष्ठान कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड शाखेच्यावतीने हनुमान मंदिरमध्ये गुरुवारी रात्री धारकऱयांची बैठक पार पडली.
होनगा येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभागप्रमुख संदीप पाटील व कंग्राळी खुर्द विभागप्रमुख महादेव दिंडे व इतर विभागप्रमुख हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते श्री हनुमान मूर्ती पूजनाने बैठकीला प्रारंभ करण्यात आला.
मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे दुर्गामाता दौड शासनाच्या नियमानुसार काढण्यात आली. यावषी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दौड मोठय़ा उत्साहात काढण्याचा निर्धार करण्यात आला. दौडमध्ये धारकऱयांनी घ्यावयाची खबरदारी तसेच छ. शिवाजी महाराजांचा व भगव्या ध्वजाचा आदर्श डोळय़ांसमोर ठेवून दौड यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक युवकांनी दौडमध्ये सामील होण्याचे आवाहन संदीप पाटील यांनी केले. दौडमध्ये शिवप्रति÷ान हिंदुस्थानला गालबोट लागेल, असे कोणतेही कृत्य धारकऱयांनी करू नये, असे मार्गदर्शन महादेव दिंडे यांनी केले.
बैठकीस धारकरी निरंजन जाधव, शंकर पाटील, प्रवीण चव्हाण, सागर भेकणे, किरण कोळी, आदित्य जाधव, मारुती निलजकर (गौंडवाड), परशराम पवार (गौंडवाड), प्रवीण पवार (गौंडवाड), किरण कोलते, शुभम चौगुले, योगेश पवार, ओमकार पाटील, आकाश पाटील, किरण कागणकरसह इतर धारकरी उपस्थित होते.
देसूरमध्ये दुर्गामाता मूर्ती स्थापनेसाठी मंडप उभारणी
देसूर येथे सोमवारपासून नवरात्रोत्सव, घटस्थापना त्याचप्रमाणे दुर्गामातेची स्थापना होणार असून येथे प्रत्येक गल्लीत दुर्गामातेच्या स्थापनेसाठी मंडप उभारणी सुरू आहे. घटस्थापनेदिवशी दुर्गामाता मूर्तीची स्थापना करून नवरात्रोत्सवकाळात दररोज भाविक दुर्गादेवीची विधिवत पूजा करून त्यानिमित्त प्रत्येक मंडळातर्फे पारंपरिक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. येथील नवीन वसाहत सातेरी माउलीनगर व शिवाजीनगर येथेही दुर्गामाताचे मंडप उभारण्यात येत आहेत. गल्लीमध्ये दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नऊ दिवस येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दररोज पहाटे 5.30 ते सकाळी 7 या वेळेत दुर्गामाता दौड विविध भागातून निघणार आहे.
कुप्पटगिरी येथे नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम
कुप्पटगिरी येथील नवरात्रोत्सव कमिटीतर्फे कलमेश्वर मंदिरात नऊ दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवार दि. 26 रोजी घटस्थापना करण्यात येणार असून दि. 27 ते रविवार दि. 2 ऑक्टोबरपर्यंत रात्री 9 ते 11 विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दि. 27 रोजी मष्णू पांडुरंग जोशीलकर यांचे प्रवचन, दि. 28 रोजी शशीकांत गावडे यांचे प्रवचन, दि. 29 रोजी माउली महिला भजनी मंडळ यांचे भजन, दि. 30 रोजी विश्वास किरमटे यांचे प्रवचन, दि. 1 ऑक्टोबर श्री विठ्ठल रखुमाई भजनी मंडळाचे भजन तर दि. 2 रोजी भजनी भारुड यासह इतर धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
नंदगड श्री दुर्गादेवी मंदिरात नवरात्रोत्सव
नंदगड येथील आनंदगड किल्ल्यावरील स्वयंभू श्री दुर्गादेवी मंदिरात सोमवार दि. 26 रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे. या निमित्त दि. 26 रोजी पहाटे चौघडा वादन, सकाळी 9 वाजता स्वयंभू श्री दुर्गादेवी सीमा द्वारपाल कमानीपासून मंदिरापर्यंत सवाद्य भक्तमंडळी, सुवासिनी, वतनदार यांच्या उपस्थितीत देवीची शैलपुत्री स्वरूपात पूजा करून घटस्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रार्थना, गाऱहाणे, आरती होऊन नवरात्रोत्सवाची सुरुवात करण्यात येणार आहे.
दि. 27 रोजी ब्रह्मचारिनी रुपात देवीची पूजा, महाप्रसाद, तसेच दुपारी लालवाडी येथील भजनी मंडळ व त्यानंतर सिद्ध समाधी योग भजनी मंडळ बेळगाव यांचा भजन कार्यक्रम, दि. 28 रोजी चंद्रघटा रुपात पूजा व महाप्रसाद, त्यानंतर सावरगाळी, हलसाल येथील भजनी मंडळाची भजन सेवा होणार आहे. गुरुवार दि. 29 रोजी कुश्मांडू रुपात पूजा, त्यानंतर करंजाळ येथील भजनी मंडळाची सेवा, शुक्रवार दि. 30 रोजी स्कंदमाता रुपात पूजा, भालके व गुंजी येथील भजनी मंडळाची सेवा, शनिवार दि. 1 ऑक्टोबर रोजी कात्यायणी रुपात पूजा, हडलगा येथील भजनी मंडळाची भजन सेवा, दि. 2 रोजी सकाळी 11 ते 2 दुर्गा होम, कालरात्री अवतारात पूजा, त्यानंतर शिंदोळी येथील भजन मंडळाची सेवा होणार आहे. दि. 3 रोजी महागौरी अवतारात पूजा, तीर्थप्रसाद व गर्बेनहट्टी तसेच पडलवाडी येथील भजन मंडळाची सेवा, दि. 4 रोजी सिद्धदात्री व महिषासुरमर्दिनी अवतारात देवीची पूजा, त्यानंतर महाप्रसाद, खंडेनवमी आयुध पूजा, कुणकीकोप भजनी मंडळाची सेवा, दुपारी स्वयंभू श्री दुर्गादेवीला गाऱहाणा व देवीचा मान, प्रसाद वाटप, दि. 5 रोजी दसरा सीमोल्लंघन त्यानंतर नंदगड येथील भजनी मंडळाचे भजन, गुरुवार दि. 6 रोजी सकाळी आरती होऊन नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. असे स्वयंभू श्री दुर्गादेवी नवरात्र उत्सव कमिटी नंदगडतर्फे कळविण्यात आले आहे.