Tarun Bharat

कोरोना काळात महाविकास आघाडीच्या १८ मंत्र्यांच्या उपचाराचा खर्च सरकारी तिजोरीतून

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कोरोना काळात एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागलेली असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना काळात राज्य सरकारमधील १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत सरकारी तिजोरीतून बिलं भरल्याचा प्रकार समोर आला आहे. लाखोंचा खर्च केल्याचं वृत्त झी २४ तासने दिलं आहे. उपचाराचा सर्व खर्च सरकारी तिजोरीतून भरण्यात आला. ही माहिती समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. (During Corona period 18 ministers of MVA received treatment from govt teasury)

महाराष्ट्रात कोरोना महामारीचं भयानक संकट असताना तसेच जनता या काळात रुग्णालयातील बेडसाठी धडपड करत असताना मंत्र्यांनी मात्र खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले आहेत. विशेष म्हणजे या लाखो रुपयांच्या खर्चाची बिलं सरकारी तिजोरीतून भरण्यात आली आहेत. गेल्या दोन मंत्र्यांनी हे उपचार घेतले आहेत. या सर्व मंत्र्यांचा एकूण खर्च हा १ कोटी ३९ लाख रुपये इतका झाला आहे. या उपचार घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक ९, काँग्रेसचे ६ तर शिवसेनेच्या ३ मंत्र्यांचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपेंचाही समावेश आहे.

कोणत्या मंत्र्यांचा समावेश आणि किती झाला खर्च?

राजेश टोपे (राष्ट्रवादी) – ३४ लाख

नितीन राऊत (काँग्रेस) – १८ लाख

हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) – १४ लाख

अब्दुल सत्तार (शिवसेना) – १२ लाख

जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) – १२ लाख

छगन भुजबळ (राष्ट्रवादी) – ९ लाख

सुनील केदार (काँग्रेस) – ९ लाख

जयंत पाटील (राष्ट्रवादी) – ७ लाख

सुभाष देसाई (शिवसेना) – ७ लाख

अनिल परब (शिवसेना) – ७ लाख

Related Stories

कापरी येथे बिबट्याच्या हल्यात खिलार खोंडा मृत्यू

Abhijeet Khandekar

पाणी गळत्या काढण्याचे काम युद्धपातळीवर

Patil_p

अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका ; याचिका फेटाळली

Archana Banage

कर्नाटक टीईटी निकाल २०२१ जाहीर

Archana Banage

अक्कलकोटमधील मृत व्यापाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Archana Banage

मध्य रेल्वेच्या हॉलिडे होमला वनविभागाचे टाळे

Patil_p