पाटणा / वृत्तसंस्था
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार शनिवारी छट घाटाची पाहणी करत असताना शनिवारी थोडक्यात बचावले. मुख्यमंत्र्यांची बोट (स्टीमर) पुलाच्या खांबाला धडकल्यामुळे दुर्घटना घडली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत सहकारी मंत्री आणि इतर पदाधिकारीही हजर होते. या दुर्घटनेनंतर दुसऱया बोटीमधून सर्वांना किनाऱयावर आणण्यात आले. सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. पिलरला (खांब) धडकल्याने बोटीचेही नुकसान झाले आहे.
छठ उत्सवापूर्वी गंगा नदीला पूर आल्याने घाटांवर छठपूजा करणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत प्रशासन छठपूजेसाठी पर्याय शोधत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार छठ घाटांची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले होते. गंगा नदीतील घाटांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री बोटीमधून गेले होते. यावेळी अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले असून छठच्या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी घाटांची पाहणी केल्याचे सांगण्यात आले आहे. दानापूरमधील नसरीगंज ते पाटणा शहरातील गायघाटपर्यंत स्ट्रीमरद्वारे छठ घाटांची पाहणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता, सुरक्षितता आणि स्वच्छतेबाबत अधिकाऱयांना अनेक सूचना दिल्या आणि छठ व्रतांची सुरक्षितता आणि सोयी कोणत्याही परिस्थितीत राखल्या जाव्यात, असे सांगितले. सुरक्षेसाठी आणि वाहतुकीसाठी आवश्यक बॅरिकेडिंग देखील करण्यात यावे आणि घाटापर्यंत जाणाऱया रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. गंगा नदीच्या पाण्याची पातळी आणि प्रवाह पाहता छठ घाटांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना दिले. या पाहणी दौऱयावेळी जलसंपदा मंत्री संजय कुमार झा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव दीपक कुमार, मुख्य सचिव आमिर सुभानी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.