Tarun Bharat

Dasara Melava : एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांनी सोडलं मैदान

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच दोन ठिकाणी दसरा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदेंचाबांद्रा BKC मैदानावर. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवतीर्थावरील उद्धव ठाकरेंचे भाषण झाल्यानंतर भाषण केलं आणि उद्धव ठाकरेंच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना शिंदे यांनी अनेक आरोप केले. दरम्यान या मेळाव्यासाठी बस मधून राज्यभरतून कार्यकर्ते हे मुंबईत दाखल झाले होते. एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू झाले तेव्हा कार्यकर्त्यांचा उत्साह भरपूर होता. मात्र, शिंदे यांचे भाषण लांबल्याने अनेक कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असतांनाच निघून गेल्याने मैदान रिकामे पडले होते.

शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या सभेसाठी अनेक नागरिक हे सकाळपासून हे मैदानात आले होते. त्यामुळे अनेक नागरिक हे कंटाळले होते. माध्यमांच्या प्रतिनिधीनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारले की कुणाच्या सभेला आला आहात, याचे उत्तर देखील त्यांना देता आले नाही. यामुळे सकाळपासून बसलेले अनेक नागरिक हे कंटाळले. मुख्यमंत्री यांचे भाषण उशिरा सुरू झाल्याने तो पर्यंत त्यांचा बसण्याचा धीर हा टिकून राहिला नाही. त्यांचा संयम सुटल्याने अनेक नागरिक हे मैदानातून उठून बाहेर पडले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला पण, त्यांना कुठल्याची प्रकारची दाद न देता बाहेर गावरून आलेले अनेक जण हे मैदानाबाहेर पडल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असतांनाच ओस पडले होते.

हे ही वाचा : …तर पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन – उद्धव ठाकरे

दरम्यन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण तब्बल १ तस २८ मिनिट चालले. भाषणाच्या सुरुवातीला लिहून आणलेल्या कागदावरून त्यांनी भाषण वाचून दाखवण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतर लांबलेल्या त्यांच्या भाषणामुळे अनेक कार्यकर्ते हे भाषण सुरू असतांनाच बाहेर पडले. यामुळे मोठ्या प्रमाणणात लावलेल्या खुर्च्या या रिकाम्या पडल्या होत्या. शिंदे यांच्या मेळाव्यासाठी तब्बल ३ हजार एसटी बस मधून कार्यकर्ते हे मुंबईला आले होते. सुरवातीला अनेक कार्यकर्ते हे जागा नसल्याने परत गेले होते. विशेष गाड्यांमधून आणलेल्या या कार्यकर्त्यांची विशेष बडदास्त ठेवली गेली होती. त्यांच्या नाश्ता आणि जेवणाची देखील सोय करण्यात आली होती.

Related Stories

कर्नाटकातील हिजाब प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे

Abhijeet Khandekar

राज्यपालांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही- संभाजीराजे

Abhijeet Khandekar

औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1397 वर

Tousif Mujawar

ममता बॅनर्जी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

datta jadhav

कोल्हापूर बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ

Archana Banage

मंकीपॉक्सच्या वाढत्या उद्रेकामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर; WHO ची घोषणा

Archana Banage
error: Content is protected !!