कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेने 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री आणि आमदारांना हॉटेल्सऐवजी शेतकऱ्यांच्या घरी राहण्याची व्यवस्था केली आहे. यावेळी हॉटेलमध्ये राहून सरकारचा पैसा उधळपट्टीने खर्च करण्याऐवजी मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांचे आतिथ्य स्वीकारावे, असे कर्नाटक प्रदेश शेतकरी संघटना आणि हरित सेनेचे प्रमुख प्रकाश नायक म्हणाले. अधिवेशनाला येणाऱ्या मंत्रीमहोदयांना राहण्या-खाण्याची सोय करण्यात येईल तसेच त्यांना दुपारी जेवणाचा डब्बा ही दिला जाणार आहे. सरकारचे पैसे वाचवण्यासाठी मंत्र्यांनी आपल्या प्रवासासाठी सरकारी बसचा वापर करावा. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करा आणि कोरोना पीडित कुटुंबाला मदतही करा. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी विधानसभा व परिषदेतही मूक उपस्थिती दर्शवणार आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना पाहून त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्याची सरकारला आठवण होईल. यावेळी रवींद्र सुब्बण्णवर, सुरेश मरयक्काचे, सुरेश परगण्णवर आदी उपस्थित होते.
Trending
- हरमलात पावणे दोन कोटीचे ‘मॅजिक मशरुम्स’ जप्त
- चारही जणांची दहा तास चौकशी
- गोव्यातून गेला तामिळनाडूतील शाळा बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याचा ईमेल
- सोमवारपासून दहावीची परीक्षा
- भंडारी समाजाच्या चार नेत्यांची सतावणूक बंद करावी : किरण
- जांबावलीच्या शिशिरोत्सवाला प्रारंभ 2 रोजी दामोदराचा गुलालोत्सव
- शहर तापले…पारा 38 अंशांवर
- ‘गृहलक्ष्मी’साठी पोस्ट खात्यात लाभार्थ्यांची रांग