मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
आमदार अनिल बेनके आयोजित नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दसरा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मोठय़ा उत्साहात पार पडले.
सरदार्स मैदानावर आयोजित या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घानप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. एम. बी. जिरली, डीसीपी रविंद्र गडादी, आमदार अनिल बेनके, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी दीप प्रज्वलन करून व आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.