क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
दिल्ली येथे होणाऱया खेलो इंडिया राष्ट्रीय महिला साखळी व अग्रमानांकित ज्युडो स्पर्धेसाठी बेळगावचा डीवायईएस महिला ज्युडो संघ दिल्लीला रवाना झाला.
20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान खेलो इंडिया राष्ट्रीय महिला साखळी व अग्रमानांकीत ज्युडो स्पर्धांचे आयोजन आयजी स्टेडियम दिल्ली येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी बेळगावच्या डीवायईएस महिला ज्युडो संघातील श्वेता अलकनूर, रक्षिता कुमार, सोनालिका सी. एस., शगुफ्ता वालीकर, संजना शेठ, संजना कुरबर, ऐश्वर्या, साईश्वरी कोडचवाडकर, अक्षता सुनकड, सहना एस. आर., भूमिका व्ही. एन., रक्षता नाईक, वसुंधरा एम. एन., पार्वती अंबाली, अमृता नाईक या खेळाडूंसमवेत ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटीलही रवाना झाल्या आहेत. या सर्व खेळाडूंना जिल्हा युवजन क्रीडा अधिकारी जिनेश्वर पडणाड यांनी शुभेच्छा दिल्या.