Tarun Bharat

KOlhapur : नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी ई-पासचीही सोय

देवस्थान समितीच्या बैठकीत निर्णय; परगावसह स्थानिक भाविकांना मिळणार जलद दर्शन पाससाठी दोनशे रुपये घेण्याबाबत समिती विचाराधीन

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

नवरात्रौत्सव काळात परगावगासह कोणत्याही स्थानिक भाविकांना अंबाबाईचे दर्शन जलदगतीने घेता यावे, यासाठी पेड स्वरुपात ई-पासची सोय करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजातून मंदिरात सोडल्या जाणाऱया मुख्य दर्शन रांगेजवळूनच ई-पास काढलेल्या भाविकांची रांग मंदिरात सोडून त्यांना भरत मंदिराजवळून अंबाबाईच्या दर्शनास सोडण्याचेहे बैठकीत ठरवण्यात आले आहे.

बैठकीच्या प्रारंभी देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी तुळजापूरातील तुळजा भवानीमातेच्या दर्शनासाठी जशी पेड स्वरुपात ई-पास सेवा आहे, त्या धर्तीवर अंबाबाईच्या दर्शनासाठीही ई-पास सेवा सुरु करावी, असा मुद्दा मांडला. नवरात्रौत्सव काळात दररोज शेकडो भाविक अंबाबाईचे थेट दर्शन मिळावे यासाठी सातत्याने देवस्थान समितीकडे संपर्क साधत असतात. यामध्ये परगावसह व्हीआयपी लोकांचा मोठा समावेश असतो. तेव्हा याचा विचार करुन पेड स्वरुपात अंबाबाईच्या दर्शनासाठी ई-पास सेवा सुरु केल्यास योग्य होईल, असेही नाईकवाडे यांनी बैठकीत सांगितले. त्यांच्या सांगण्याचा सारासार विचार करुन देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संपूर्ण नवरात्रौत्सवात ई-पास सेवा सुरु करण्यास सहमती दर्शवली.
दरम्यान, भाविकांना अंबाबाईच्या दर्शनासाठी www.mahalaxmikolhapur.com या गतवर्षीच्या संकेतस्थळाद्वारेच ई-पास काढता येईल, असे नाईकवाडे यांनी सांगितले. ते म्हणाले, सध्या हे संकेतस्थळ अपडेट केले जात असून ते येत्या आठ दिवसात भाविकांसाठी खुले केले जाईल. ई-पासच्या दर्शनासाठी दोनशे रुपये आकार स्वीकारण्याबाबत देवस्थान समिती विचाराधिन आहे. देवस्थान समितीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, एवढाच ई-पास पेड करण्यामागे उद्देश आहे, असेही नाईकवाडे यांनी सांगितले.

Related Stories

माझ्या जडणघडणीत धनगर समाजाचे योगदान मोलाचे

Archana Banage

रांगणा किल्ल्याचे संवर्धन निकृष्ट दर्जाचे – खा. संभाजीराजे

Archana Banage

Kolhapur; कुख्यात इराणी हिसडा गँगच्या म्होरक्यासह चौघे अटकेत

Kalyani Amanagi

कर्नाटक बिटकॉइन घोटाळा: भाजपने नेतृत्व बदलाची शक्यता फेटाळली

Abhijeet Khandekar

कोल्हापुरात दक्षिण आफ्रिकेचा मालवी आंबा दाखल

Archana Banage

कोल्हापूर : महापालिकेच्या शाळेत पहिली पासून `सेमी इंग्लिश’ सुरू करणार

Archana Banage
error: Content is protected !!