ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
वाहनांमध्ये E20 म्हणजेच 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
E20 पेट्रोल कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोकार्बन्स सामान्य पेट्रोलपेक्षा खूपच कमी उत्सर्जित करतात. त्यामुळे हे पेट्रोल पर्यावरण रक्षणासाठी चांगले आहे. सध्या पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळले जात आहे. आता 20 टक्के मिसळले जाईल. मात्र, E20 पेट्रोल कोणत्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना योग्य आहे ते वाहन उत्पादक कंपन्यांनी ठरवून संबंधित वाहनांवर तसे स्टिकर्स लावावे लागतील.
2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.