देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात एस.एन. डी. टी महिला विद्यापीठाचे प्रवेश सुरु
सावंतवाडी । प्रतिनिधी
गवाणकर महाविद्यालयामध्ये एसएनडीटी विद्यापीठाचे प्रवेश चालू झाले असून बी.ए बी.कॉम तसेच एम.ए. (MA) यात मराठी ,हिंदी ,समाजशास्त्र ,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र ,इतिहास (मराठी व इंग्रजी माध्यम ) व एम कॉम (M.Com) यामध्ये प्रवेश घेऊन महिला वर्ग आपले काम सांभाळून पदवी व पदव्यूत्तर पदवी पूर्ण करू शकतात.तसेच अभ्यास शुल्कामध्ये अध्ययन साहित्य उपलब्ध होते. ओबीसी ,एससी, एसटी आदी विद्यार्थिनींना फी मध्ये सवलत आहे. शासकीय व निमशासकीय शिक्षण व बँकिंग क्षेत्रात व कंपनीमध्ये आदी मध्ये काम करत असणाऱ्या महिला वर्गाला आपले शिक्षण पूर्ण करता येते. महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून त्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 असून महिला वर्गाने या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा.किरणजी ठाकूर यांनी केले आहे संपर्कासाठी नंबर- 8698072090, 9420821299 ,पत्ता – गव्हाणकर महाविद्यालय रामेश्वर प्लाझा पहिला मजला मोती तलाव नजीक सावंतवाडी