पोर्ट ब्लेयर
अंदमानमध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.9 इतकी होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने ही माहिती दिली आहे. भूकंपामुळे कुठल्याही प्रकारची जीवित तसेच आर्थिक हानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. भूकंपाचे धक्के मंगळवारी पहाटे जाणवले असून याचे केंद्र अंदमान सागरात होते. भूकंपाचे केंद्र 77 किलोमीटर खोलवर होते असे सांगण्यात आले आहे.