वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2022-23 च्या भारतीय महिला लिग फुटबॉल स्पर्धेत इस्ट बंगालने आपले पदार्पण केले आहे. या स्पर्धेत विद्यमान विजेता गोकुळाम केरळ एफसी आणि इस्ट बंगाल यांच्यात सामना खेळवला जाणार आहे.
महिलांच्या फुटबॉल क्षेत्रात पहिल्यांदाच इस्ट बंगालने पर्दापण केले आहे. इस्ट बंगाल महिला फुटबॉल संघाची या स्पर्धेत निश्चितच दर्जेदार कामगिरी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सुजाता करच्या नेतृत्वाखाली 2001 साली इस्ट बंगाल महिला फुटबॉल संघाने पहिल्यांदा कोलकाता महिला फुटबॉल लिग स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. भारतीय महिला फुटबॉल क्षेत्रामध्ये सुजाता कर ही अव्वल भारतीय आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉलपटू गाजली होती. त्यानंतर भारताची दुसरी महिला फुटबॉलपटू बालादेवीने स्कॉटलंडमधील रेंजर्स क्लबशी करार करून तेथे फुटबॉल स्पर्धेत आपला सहभाग दर्शवला होता.