mysore bonda recipe: सध्या पावसाचं वातावरण आहे.आणि अशा वेळेला आपल्याला काहीतरी चटपटीत खावसं वाटतं.म्हणूनच आज आपण दक्षिण भारतातील प्रसिद्ध असणारी म्हैसूर भजी कशी बनवतात ते पाहणार आहोत हे भजी सोपी आणि झटपट होणारी तर आहेच त्याचबरोबर याचा स्वादही उत्तम आहे.
म्हैसूर बोंड्यासाठी लागणारे साहित्य :
मैदा १ कप
तांदळाचं पीठ १ टे स्पून
दही १/२ कप
कोथिंबीर
ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे
बारीक केलेली हिरवी मिरची
मीठ १ टी स्पून
सोडा १/४ टी स्पून
तेल
पाणी
कृती:
सर्वप्रथम एका मोठ्या बाऊल मध्ये अर्धा कप दही घ्या. त्यामध्ये पाव चमचा सोडा आणि एक चमचा मीठ घालून चांगलं फेटून घ्या. हे मिश्रण १० मिनिटे झाकून लावून बाजूला ठेवा.यांनतर मिश्रणात एक कप मैदा आणि १ चमचा तांदळाचे पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.तसेच त्यामध्ये कोथिंबीर, बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि ओल्या खोबऱ्याचे तुकडे घालावेत. मिश्रण जर घट्ट वाटत असेल तर त्यात थोडसं पाणी घालावं. तयार झालेलं पीठ सेट होण्यासाठी थोडावेळ बाजूला ठेवावं.(यामुळे भजी जाळीदार आणि आतून सॉफ्ट बनते) यानंतर गॅस वर तेल ठेवावे. तेल तापल्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत. तयार झालेले कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असलेले स्वादिष्ट म्हैसूर बोंडे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.


previous post