Tarun Bharat

समोसा खाऊन जिंका 51 हजार

केवळ पूर्ण करावी लागणार एक अट

समोसा हा असा खाद्यपदार्थ आहे जो समस्त भारतीयांना अत्यंत पसंत आहे. समोसा लोक वर्षभर मोठय़ा आनंदाने खाऊ शकतात. याचदरम्यान इंटरनेटवर बाहुबली समोसा चॅलेंज व्हायरल होत आहे. यात लोकांना 51 हजार रुपये जिंकण्याची संधी दिली जात आहे. परंतु एका अटीनुसार हा बाहुबली समोसा तुम्हाला 30 मिनिटांमध्ये खाऊन संपवावा लागणार आहे. बाहुबली समोशाचे वजन 8 किलोग्रॅम आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी बाहुबली समोसा चॅलेंजमध्ये भाग घेतला असला तरीही कुणालाच 30 मिनिटांमध्ये तो संपविता आलेला नाही.

उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये कुर्ती बाजारातील एका मिठाईच्या दुकानाकडून बाहुबली समोसा चॅलेंज देण्यात येत आहे. या समोशाला चर्चेत आणण्यासाठी काहीतरी वेगळे करू इच्छित होतो. याचमुळे आम्ही बाहुबली समोसा तयार करण्याचा निर्णय घेतला. पूर्वी 4 किलोग्रॅमचा बाहुबली समोसा तयार केला आणि आता तो आकार वाढवून 8 किलोचा करण्यात आल्याचे दुकानदाराने सांगितले आहे.

इतका खर्च

8 किलोग्रॅमचा समोसा तयार करण्यासाठी सुमारे 1100 रुपयांचा खर्च येतो. बाहुबली समोशामध्ये बटाटा, पनीर आणि ड्रायप्रूट्सचा समावेश करण्यात येतो. आतापर्यंत कुणीच हे चॅलेंज पूर्ण करू शकलेला नाही. आता आम्ही 8 किलोग्रॅमचा बाहुबली समोशाचा आकार वाढवून 10 किलोग्रॅमचा करणार आहोत असे दुकानदार शुभमने सांगितले आहे.

लोकप्रिय होतोय

बाहुबली समोसा लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. यामुळे दुकानातील ग्राहकांची संख्या वाढली आहे. विविध राज्यांमधून फूड ब्लॉगर येथे बाहुबली समोसा पाहण्यासाठी आणि रील्स तयार करण्यासाठी पोहोचत असल्याचे त्याने सांगितले आहे.

Related Stories

लॉकडाऊनमध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठी गुगलकडून डूडलमध्ये कोडिंग गेम

prashant_c

घरांमध्ये वर्षानुवर्षे ठेवतात मृतदेह

Patil_p

केरळमधील श्वान करतोय जगाची भ्रमंती

Amit Kulkarni

जगातील सर्वात धोकादायक सरोवर

Patil_p

लॉटरीत जिंकलेले सोळाशे कोटी रुपये पर्यावरणासाठी

Patil_p

भिकाऱयांच्या मुलांसाठी सुरू केली शाळा

Amit Kulkarni