नावावर झाला विश्वविक्रम
आवडीचा खाद्यपदार्थ मिळाल्यावर लोक तो तावातावाने खात असतात. परंतु तुम्हाला एकच गोष्ट सातत्याने दिली तर तुम्ही कदाचित कंटाळून जाला. पण अमेरिकेत एका व्यक्तीला मॅकडोनाल्ड्सच्या बिग मॅकवर इतके प्रेम आहे की तो मागील 50 वर्षांपासून जवळपास दरदिनी एक बिग मॅक खात आहे.
बिग मॅकवरील प्रेमापोटी त्यांनी स्वतःचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविले आहे. त्यांनी स्वतःच्या विक्रमचा जल्लोष देखील मॅकडोनाल्ड्समध्ये जात बिग मॅक खाऊनच केला आहे.
68 वर्षीय डोनाल्ड गोर्स्की हे अमेरिकेच्या विस्कॉन्सिन प्रांतात राहतात. गोर्स्की हे एका तुरुंगात सुरक्षारक्षक होते, परंतु आता ते निवृत्त झाले आहेत. गोर्स्की यांना बिग मॅक अत्यंत आवडत असल्याने एका दिवसात ते दोन बिग मॅक देखील खाऊ शकतात.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात गोर्स्की यांनी स्वतःच्या जीवनात सर्वाधिक बिग मॅक बर्गर खाण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला. 17 मे 1972 पासून त्यांनी बिग मॅक बर्गर खाण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ते सलग 50 वर्षांपासून दररोज एक बिग मॅक बर्गर खात आहेत. 7 मे 2022 रोजी त्यांनी बिग मॅक लव्ह’चे 50 वे वर्ष साजरे केले. 1972 पासून आतापर्यंत आपण केवळ 8 दिवस बिग मॅकपासून दूर राहिलो आहे. 1982 मध्ये एक भीषण वादळ आल्याने मॅकडोनाल्ड्स काही काळासाठी बंद झाले होते. त्यानंतर एकदा आईच्या निधनामुळे बिग मॅकपासून दूर राहिल्याचे गोर्स्की यांनी सांगितले आहे. गोर्स्की यांनी पहिल्यांदा फोंड डू लेक शाखेत बिग मॅक खाल्ला होता आणि तेथूनच बिग मॅकवरील त्यांचे प्रेम सुरू झाले होते.