कोल्हापूर प्रतिनिधी:
करवंदे अशी गोष्ट आहे की, लहान असो वा प्रौढ, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. ज्यांना आंबट पदार्थ आवडतात त्यांनी करवंदाचे लोणचे, चटणी, भाज्या कधी ना कधी खाल्ल्या असतीलच. करवंद हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. कारण त्यात प्रथिने, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात, ते चवीसोबत आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. चला जाणून घेऊया करवंदाचे फायदे-
*दात निरोगी ठेवतात
करवंदे खाणे दात आणि हिरड्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे दात मजबूत होतात आणि हिरड्याही निरोगी राहतात. श्वासाची दुर्गंधी आणि पायरियासारख्या समस्या दूर होऊन दात निरोगी राहण्यास मदत होते. पोटाशी संबंधित समस्या दूर होतात आणि पोट निरोगी राहते. करवंदामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता,गॅस आणि अॅसिडिटी सारख्या समस्यांपासून सुटका मिळते तसेच लूज मोशन सारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
*इम्युनिटी वाढवते
करवंदे खाणयामुळे आपली इम्युनिटी वाढते. शरीराची प्रतिकारशक्ती चांगली राहते. शरीराच्या विविध रोगांशी लढण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावते. करवंदमध्ये असलेले लोह, हिमोग्लोबिन शरीरात रक्ताची कमतरता होऊ देत नाही.
*शरीरातील कोलेस्टेरॉलचे लेवल नियंत्रित करते
करवंदाची भाजी किंवा रस शरीरातील कोलेस्ट्रॉलचे लेवल नियंत्रणात ठेवते आणि हृदयाशी संबंधित समस्या दूर ठेवते. उच्च रक्तदाबासारखे आजार दूर राहतात. वजन वाढण्याची समस्या बऱ्याच अंशी कमी होते.