Tarun Bharat

खड्डयात जिलेबी खाऊन महापालिकेचा निषेध

जुना फुलेवाडी रिंगरोडवरील नागरिकांचे स्वातंत्र्यदिनी अनोखे आंदोलन

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

जुना फुलेवाडी रिंग रोडवरील खराब झालेला रस्ता नव्याने करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी स्वातंत्र्यदिनी अनोखे आंदोलन केले. खड्ड्यामध्येच जिलेबी खाऊन महापालिका प्रशासनाचा निषेध केला.

जुना फुलेवाडी रिंगरोड येथील रस्त्यासाठी परिसरातील नागरिकांनी अभ्यंग स्नान, रस्त्याचे श्राद्ध, रस्ता रोको आणि प्रसंगी आत्मदहनाचा इशारा ही दिला आहे. या नंतर प्रशासनाने रस्ता मंजूर झाल्याचे सांगितले. परंतू हा रस्ता काही झाला नाही. यंदाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जुन्या फुलेवाडी रिंग रोड येथील नागरिकांनी या रस्त्यामधील खड्ड्या बसून जिलेबी खावून आणि रस्त्या वरील ये जा करणाऱया नागरिकांना जिलेबी वाटून खड्ड्यातच स्वातंत्र्य दिन साजरा केला. यावेळी मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी नगरसेवक अमोल माने, सुहास आजगेकर, शीतल सुर्यवंशी, रवींद्र चिखलकर, अमित पाटील, सतीश खोत, समर जीत जगदाळे, अक्षय चाबूक, सारंग रणदिवे, पवन साळोखे, शुभम कांबळे, बबलू चव्हाण आदी उपस्थित होते.

Related Stories

राधानगरी पोलिसांकडून मोटरसायकल चोरट्यास अटक

Abhijeet Shinde

कोल्हापूर : 22 हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांचा पोबारा

Abhijeet Shinde

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : सकाळी ९ वाजेपर्यंत ६.९६ टक्के मतदान

Abhijeet Shinde

संशयिताच्या ‘स्वाब’ तपासणीस ‘एनआयव्ही’चा नकार

Abhijeet Shinde

कोडोलीत विजेचा शॉक लागून विहरीत पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

Sumit Tambekar

कोल्हापूर : वीजतारांच्या धक्क्याने सासू-सुनेचा दुर्दैवी मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!