Tarun Bharat

पिझ्झा खाताय?… जरा जपून

Advertisements

आहार आणि आपले आयुष्य यांचा बराच नजीकचा संबंध असतो, असे दिसून आले आहे. विशेषतः फास्ट फूड खाणाऱया लोकांसाठी ही माहिती फार महत्त्वाची आहे. पिझ्झा, हॉट डॉग, बर्गर आदी पदार्थ जे भारतीय खाद्यसंस्कृतीचा भाग कधीच नव्हते, ते आता मध्यमवर्गीय समाजातही लोकप्रिय होताना दिसत आहेत. मात्र, या पदार्थांमुळे आपले आयुष्य कमी होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

आपण हॉट डॉग हा पदार्थ एकदा खाल्ल्यास आपल्या आयुष्यातील 36 मिनिटे कमी होतात. तसेच पिझ्झा एकदा खाल्ल्यास आयुष्य 8 मिनिटांनी कमी होते, असा निष्कर्ष अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाने संशोधनांती काढला आहे. मात्र, एक केळे खाल्ल्यास आयुष्य 13 मिनिटांनी वाढते, असेही हे संशोधन सांगते. पिझ्झा, हॉट डॉग आदी फास्ट फूडची माणसाला लवकर चटक लागते. मात्र, हे पदार्थ पचनशक्तीला मारक आहेत. असे पदार्थ पचविण्यासाठी शरीराला जास्त शक्ती खर्च करावी लागते. लिव्हरवरही जास्त प्रमाणात ताण पडतो. याचा परिणाम आयुष्याची मिनिटे कमी होण्यात होतो. त्यामुळे हे पदार्थ मोजकेच खाल्ले पाहिजेत. मुख्य भर नैसर्गिक पदार्थांवर म्हणजेच भाजीपाला, फळे, मध, कमी शिजवलेले पदार्थ तसेच भात, पोळी, चपाती, भाकरी, कोशिंबिर आदी पदार्थांचा आहारात अधिकाधिक वाटा असला पाहिजे, असेही आहारतज्ञांनी आवर्जून बजावले आहे.

मिशिगन विद्यापीठाच्या या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे लोकांच्या आहारविषयक सवयी बदलतील, असा आशावाद संशोधकांनी व्यक्त केला आहे. पिझ्झाप्रमाणेच प्रक्रियाकृत मांस, गोमांस, डुकराचे मांस, चीज भरपूर घातलेले बर्गर, आईस्क्रीम, चॉकलेट असे किमान सहा हजार पदार्थ आहेत, ज्यांच्या वारंवार सेवनामुळे माणूस आपल्या पचनशक्तीची हानी करून घेतो. या हानीमुळे भविष्यकाळात कोलेस्ट्रॉल वाढणे, साखर वाढणे, रक्तदाब वाढणे आदी विकारांचा सामना करावा लागतो. ज्यातून माणसाचे आयुष्य कमी होते, याची जाणीव ठेवावी, असे संशोधकांनी बजावले आहे.

Related Stories

अचूक वेळ साधणे महत्त्वाचे

Patil_p

7 वर्षीय मुलीची 200 कोटीची कमाई

Patil_p

एका बोटाने उचलले 129.5 किलो वजन

Patil_p

गुरुपौर्णिमेला दत्तमंदिरात श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर

Tousif Mujawar

समुद्रात सापडला पंख असलेला मासा

Patil_p

गुगलकडून ‘कोरोना वॉरियर्स’ साठी खास डुडल

prashant_c
error: Content is protected !!