तणाव कमी करण्यास मदत होत असल्याचे मानणे
नेहमी आनंदी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी अमेरिकेसह अनेक देशांमध्ये डिनर थेरपीचा प्रकार वेगाने वाढला आहे. याला कौटुंबिक तणाव कमी करण्याचा सिक्रेट फॉर्म्युला देखील ठरविले जात आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार 91 टक्के पालक कुटुंबासोबत बसून भोजन केल्याने तणाव कमी होत असल्याचे मानतात.
वेकफील्ड रिसर्चने 1 हजार अमेरिकन प्रौढांवर हेल्दी फॉर गूड मूव्हमेंट अंतर्गत एक सर्वेक्षण पेले आहे. यात 84 टक्के लोकांना स्वतःच्या कुटुंबीयांसोबत भोजन करण्याची इच्छा असल्याचे दिसून आले. कारण प्रौढ व्यक्ती जवळपास निम्म्यावेळा एकटय़ानेच जेवण करत असतात. आपण काही प्रमाणात तणावग्रस्त असल्याचे दोन तृतीयांश लोकांनी म्हटले आहे. तर 27 टक्के लोक अत्याधिक तणावग्रस्त आढळून आले आहेत.
इतरांसोबत जेवण केल्याने..
सातत्याने तणावाला तोंड दिल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. जॉन हॉफकिन्समध्ये कार्डियोलॉजी डिपार्टमेंटमध्ये सह-संचालक अन् अमेरिकन हार्ट असोसिएशनचे प्राध्यापक एरिन मिचोस यांनी इतरांसोबत बसून भोजन केल्याने तणाव कमी होतो आणि आत्मसन्मानाला चालना मिळत असल्याचे म्हटले आहे. विशेषकरून मुलांसाठी सामाजिक संबंधांमध्ये सुधारणा करण्याची ही उत्तम पद्धत आहे. यामुळे मित्र, कुटुंब, सहकारी आणि शेजाऱयांशी जोडले जाण्याचे महत्त्व समजते. तर सोबत भोजन केल्याने कामादरम्यान बेक घेण्याची आठवण होत असल्याचे 54 टक्के लोकांचे मानणे आहे.
व्हिडिओ कॉलचा वापर
इतरांसोबत भोजन केल्यावर ते आरोग्यदायी ठरत असल्याचे प्रत्येक 10 पैकी 6 लोकांचे मानणे आहे. जर वैयक्तिक स्वरुपात एकत्र भेटता येत नसल्यास तणाव कमी करण्यासाठी व्हिडिओ कॉलद्वारे देखील प्रतीकात्मक एकत्रित भोजनाचा अनुभव घेता येणार आहे.