वृत्तसंस्था/ डल्लास
अमेरिकेतील डल्लास येथे एटीपी टूरवरील झालेल्या डल्लास खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत चीनच्या वू इबिंगने एकेरीचो अजिंक्यपद पटकाविताना अमेरिकेच्या अनुभवी जॉन इस्नेरचा पराभव केला. डल्लास स्पर्धेच्या इतिहासात जेतेपद मिळविणारा 23 वर्षीय इबिंग हा पहिला चीनचा टेनिसपटू ठरला आहे.
या स्पर्धेतील झालेल्या एकेरीच्या अंतिम सामन्यात इबिंगने इस्नेरचा 6-7 (4-7), 7-6 (7-3), 7-6 (12-10) अशा सेट्समध्ये पराभव केला. अंतिम सामना तीन तास चालला होता. या लढतीतील तिन्ही सेट्स टायब्रेकरपर्यंत लाबले. जॉन इस्नेरने या सामन्यात 44 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. या स्पर्धेत इबिंगने उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या आठव्या मानांकित टेलर फ्रिजचा पराभव करुन अंतिम फेरित प्रवेश मिळविला होता. इस्नेरने या सामन्यात 7 बिनतोड सर्व्हिसची तसेच 41 विजयी फटक्यांची नोंद केली.