Tarun Bharat

राज्यभरात आजपासून सीईटी

Advertisements

486 केंद्रामध्ये परीक्षा, गैरप्रकार टाळण्यासाठी करडी नजर

प्रतिनिधी/ बेंगळूर

अभियांत्रिकी, कृषी, पशूवैद्यकीय, फार्मसी आदी व्यवसायिक कोर्सच्या प्रवेशासाठी गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी सीईटी घेतली जाणार आहे. परीक्षेत गैरव्यवहार होऊ नये यासाठी परीक्षेचे पूर्णपणे चित्रिकरण करण्याचा निर्णय उच्चशिक्षण खात्याने घेतला आहे, अशी माहिती उच्चशिक्षण तसेच माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परीक्षेसाठी राज्यभरात 486 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. 16 जून रोजी सकाळी 10.30 वाजता जीवशास्त्र, दुपारी 2.30 वाजता गणित आणि 17 जून रोजी सकाळी 10.30 वाजता भौतिकशास्त्र व दुपारी 2.30 वाजता रसायनशास्त्र विषयाचा पेपर असणार आहे. 18 रोजी परराज्यात वास्तव्यास असणाऱया कर्नाटकातील विद्यार्थ्यांना कन्नड भाषेची परीक्षा असेल. कन्नड भाषा परीक्षेसाठी बेळगाव, बीदर, विजापूर, बेंगळूर, बळ्ळारी आणि मंगळूर या जिल्हय़ांमध्ये परीक्षा केंद्रे आहेत. यंदा 1708 विद्यार्थी या विषयाच्या पेपरला बसणार आहेत.

यंदा परीक्षेसाठी 2 लाख 16 हजार 526 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बेंगळूरमध्ये 87 परीक्षा केंद्रे आहेत. तर विविध जिल्हय़ांमध्ये 399 परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

परीक्षाचे होणार संपूर्ण चित्रिकरण

परीक्षा कालावधी गैरप्रकार होऊ नयेत यासाठी या व्यवस्थेचे पूर्णपणे चित्रिकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका वितरणावरही करडी नजर ठेवली जाईल, असे मंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी सांगितले. प्रत्येक परीक्षा केंद्रात साहाय्यक आयुक्त दर्जाच्या एका अधिकाऱयाला परीक्षा निरीक्षक म्हणून नेमण्याची सूचना जिल्हय़ाधिकाऱयांना दिली आहे. एकूण 486 परीक्षा निरीक्षक आणि विशेष भरारी पथकाचे 972 सदस्य, 9600 सुपरवायझर आणि 20 हजारहून अधिक अधिकाऱयांची परीक्षा प्रक्रियेसाठी नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.

Related Stories

अस्वस्थ वाटू लागल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद रूग्णालयात दाखल

Abhijeet Shinde

तमउन्नाह

Patil_p

देशाला 35 ऑक्सिजन प्रकल्प समर्पित

Amit Kulkarni

पुन्हा वेळ वाढवण्याची नुपूर शर्मांची मागणी

Patil_p

…तरीही आंदोलन सुरूच राहणार

datta jadhav

तृणमूल-भाजपच्या लढाईत डाव्यांची भूमिका महत्त्वाची

Patil_p
error: Content is protected !!