ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बेहिशेबी कर्जवाटप प्रकरणी पिंपरी चिंचवडमधील दि. सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी (Amar Moolchandani) यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली केली आहे. छापेमारीदरम्यान, मूलचंदानी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 जणांना ईडीने ताब्यात घेतले आहे.
मूलचंदानी यांच्यासह बँकेच्या इतर संचालकांवर 124 कर्जांचं बनावट कागदपत्रांच्या आधारे वाटप केल्याचा आरोप आहे. त्यांनी 400 कोटींहून अधिकचा घोटाळा केल्याचं तपासात समोर आलं आहे. याप्रकरणात मूलचंदानी यांच्यासह पाच जणांना पिंपरी पोलिसांनी अटक केली होती. काही महिन्यांपूर्वीच मूलचंदानी जामिनावर बाहेर आले होते. दरम्यान, पुन्हा याप्रकरणात ईडीने मूलचंदानी यांच्या घरावर छापेमारी केली.
अधिक वाचा : क्रीडा शिक्षकाकडून 4 अल्पवयीन विद्यार्थीनींचा विनयभंग; समुपदेशनात प्रकार उघडकीस
या छापेमारीदरम्यान, घरातच लपून बसलेल्या अमर मूलचंदानी यांनी मोबाईलमधील बेहिशेबी कर्ज प्रकरणाशी संबधित डेटा डिलीट करून पुरावे नष्ट केले. हे पुरावे नष्ट करण्यासाठी कुटुंबीयांनी त्यांना मदत केली. याप्रकरणी मूलचंदानी यांच्यासह कुटुंबातील 4 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.