ऑनलाईन टीम/तरुण भारत
माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (money laundering case) मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. मात्र, या जामिनाविरोधातच ईडीने (ED) सर्वोच्च न्यायालयात (supreme court) धाव घेतली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.
अनिल देशमुख यांना ४ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला. न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या एकल पीठाने ईडीने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मंजूर केला. देशमुख यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. देशमुख यांना ईडीच्या खटल्यात जामीन मंजूर झाला असला तरी सीबीआयच्या खटल्यात ते अजूनही कोठडीत आहेत. न्यायालयाने देशमुख यांना १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला. मात्र देशमुखांच्या जामिनाविरोधात आता ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हे ही वाचा : चिन्हांवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,नवीन चिन्ह क्रांती घडवून आणेल…
१०० कोटी वसुली प्रकरणामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, सीबीआयकडूनही गुन्हा नोंदवण्यात आल्यामुळे या जामीनावर त्यांची सुटका होणार आहे, का नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.