वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मनी लाँड्रिंग प्रकरणात हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांची ईडीच्या पथकाकडून दिल्लीत तपास सुरू आहे. बुधवार, 17 जानेवारी रोजी सकाळपासून च ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या चौकशीला सुरुवात केली होती. मुख्यमंत्री असताना हुडा यांनी गुऊग्रामला लागून असलेल्या मानेसरमध्ये खासगी बिल्डरांना फायदा करून दिल्याचा आरोप आहे. यापूर्वी, हरियाणातील मानेसर येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पथकाने दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. ईडीने आरोपपत्रात अनेक बड्या बिल्डरांची नावेही समाविष्ट केली आहेत.