Tarun Bharat

वर्षा राऊत यांची 9 तास ईडी चौकशी

मुंबई

 गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. याच प्रकरणात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची शनिवारी  ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. वर्षा राऊत यांची तब्बल 9 तास चौकशी केल्यानंतर रात्री 8 वाजता त्या ईडी कार्यालयातून बाहेर आल्या.

वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोटय़वधीचे व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे. हे पैसे खात्यात आले कसे? याबाबत त्यांची चौकशी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रवीण राऊत यांनी संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात 1 कोटी 6 लाख रुपये जमा केले होते. याच पैशातून राऊतांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. त्यामुळे ईडीकडून वर्षा राऊत यांची खाती तपासली जात आहेत. तसेच त्यांच्या खात्यात आणखी मोठे व्यवहार झालेत का त्याची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यांच्या खात्यात हा पैसा आला कुठून? कशासाठीचे हे पैसे आलेत? त्या मागचा स्रोत काय? आदी माहिती वर्षा राऊत यांच्याकडून ईडीने घेतली असल्याची शक्यता आहे.

………………..

Related Stories

पंतप्रधान मोदींचा परिवारवाद्यांवर हल्लाबोल

Patil_p

1 एप्रिलपासून धावू लागणार सर्व रेल्वेगाडय़ा

Patil_p

माताभगिनींचे सुरक्षा कवच प्राप्त

Patil_p

एक मैत्री अशी देखील!

Patil_p

भाजप आमदारावर आठवडय़ात दुसरा गुन्हा

Patil_p

रॅली-सभांवर 31 जानेवारीपर्यंत बंदी कायम

Patil_p