Tarun Bharat

ईडीची देशभरात १८ ठिकाणी छापेमारी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या मागे असणाऱ्या ईडीने (Enforcement Directorate) आपला मोर्चा आता खनिज आणि भूवैज्ञानिक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वळविला आहे. ईडीने आज झारखंड, हरियाणा, राजस्थान,पश्चिम बंगाल, बिहारमध्ये १८ ठिकाणी शुक्रवारी सकाळी ईडीनं मोठी कारवाई केली आहे.

ईडीने आज देशभरात १८ ठिकाणी मोठी कारवाई केली आहे. एका महिला सनदी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावरही ईडीनं छापा टाकल्यानं खळबळ उडाली आहे. तर झारखंडची राजधानी रांची येथील पल्स हाँस्पिटल शिवाय पंचवटी रेसिडेंट, कांके रोड, चांदनी चौक, हरिओम टॅावर येथे ईडीने छापेमारी केली आहे. झारखंडच्या खनिज आणि भूवैज्ञानिक विभागाच्या सचिव पूजा सिंघल (Pooja Singhal) यांचीही चौकशी ईडी करत असल्याचे सुत्रांनी सांगितले. तसेच उद्योगपती अमित अग्रवाल यांच्या कार्यालयावरही ईडीनं छापा टाकला आहे. 

Related Stories

उत्तराखंडमध्ये 34 नवे कोरोना रुग्ण; एकूण आकडा 1819 वर

Tousif Mujawar

टूलकिटवरून वाढला वाद, रमण सिंग यांचे आंदोलन

Patil_p

आता ‘स्पुटनिक व्ही’ लस देखील सरकार देणार मोफत; असा आहे प्लॅन

Tousif Mujawar

आम आदमी पक्षाला ईडीची नोटीस

Patil_p

मोदींच्या आदेशानुसार ट्विटर डोलतंय !

Patil_p

उत्तराखंडमध्ये भाजपचे घोषणापत्र प्रसिद्ध

Patil_p
error: Content is protected !!