कोल्हापूर- माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर ईडीचा मोर्चा आता कोल्हापूर जिल्हा बँकेकडे वळला आहे. आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेवर छापा टाकला आहे. काही दिवसांपूर्वी माझी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने अधिकाऱ्यांसह छापा टाकला होता. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मनी ट्रान्सफरचे आरोप मुश्रीफ यांच्यावर केले होते. त्याच्या तपासासाठी ईडीचे अधिकारी कोल्हापूर जिल्हा बँकेत पोहोचले आहेत.त्यांनी तपासणी सुरु केली असून ईडीचे अधिकारी आल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा बँकेच्या आवारात जमा होऊ लागले आहेत.

