Tarun Bharat

अनिल परबांच्या कारवाईवर संजय राऊतांचा इशारा

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावरील कारवाई ही राजकीय सुडापोटी सुरु असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. मनी लाॅंड्रिंग प्रकरणी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी आज पहाटेपासून सक्तवसुली संचलनालयाने छापेमारी सुरू केली आहे. यावरून राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.

भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, शिवसेना अनिल परब यांच्या पाठीशी ठाम उभी आहे. या दबावाचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.अशा कारवायामुळे भाजप रोज खड्ड्यात जात आहे. सबळ पुरावे असलेल्या जितू नवलानीला कोणी पळवले याचे उत्तर भाजपने द्यावे. फक्त शिवसेनेला त्रास देऊन त्यांना अडचणीत आणायचे आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे सर्व सुरु आहे. मात्र सर्व निवडणुका सुरळीत पार पडतील, सरकार सुरळीत चालेल.भाजपने तपास यंत्रणेला हाताशी धरले आहे.आम्ही ईडीला काही फाईल्स पाठवल्या आहेत, पण ती उघडण्याची तसदी कोणी घेत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

अनिल परब यांना दिलासा देताना ते म्हणाले, अनिल परब आमचे सहकारी आहेत. ते कडवट शिवसैनिक आहेत. कॅबिनेट मंत्री देखील आहेत.हि कारवाई सूडबुद्धीने सुरु आहे. ज्या प्रकारे आरोप ईडीकडून लावले जात आहेत,त्याहून गंभीर आरोप भाजपच्या लोकांवर आहेत.पण त्यांना कोणी हाथ लावत नाहीत. आम्ही देखील पाहून घेऊ, इशारा असा राऊतांनी दिला.

Related Stories

मी मास्क घालतच नाही, मी तुम्हालाही सांगतोय… : राज ठाकरे

Tousif Mujawar

देशात महाराष्ट्र पोलीस दलाचे काम उत्कृष्ट

Patil_p

तर पंतप्रधान मोदींना फासावर लटकवू!

Patil_p

उद्धव ठाकरेंबाबत दीपक केसरकरांचा कोल्हापुरात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, मी साक्षीदार…

Archana Banage

स्वाभिमानीच्या आंदोलनाची उदय सामंत यांनी उडवली खिल्ली, म्हणाले…

Abhijeet Khandekar

ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना बाधिताचा मृत्यू

Patil_p