वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशच्या टीकमगढचे काँग्रेस आमदार यादवेंद्र सिंह बुंदेला यांच्या निवासस्थानी ईडीने बुधवारी छापा टाकला आहे. ईडीच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी झडती सुरू केली आहे. पहाटे 5 वाजता ईडीचे पथक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. परंतु ही कारवाई कुठल्या प्रकरणी केली जात आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ईडीच्या कारवाईदरम्यान यादवेंद्र सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर सीआरपीएफ आणि मध्यप्रदेश सशस्त्र पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. ईडीच्या कारवाईदरम्यान सिंह यांच्या निवासस्थानात कुणालाही प्रवेश देण्यात आलेला नाही. तसेच आतून बाहेर पडण्याची देखील अनुमती देण्यात आली नव्हती.
आमदार यादवेंद्र सिंह बुंदेला यांचे पुत्र शाश्वत यांच्यावर आसाममध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शाश्वत हे मागील 6 महिन्यांपासून फरार आहेत. याप्रकरणी ईडीकडून कारवाई करण्यात आली असावी असे मानले जात आहे.